आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now, Rss Mouthpiece Cautions 'intolerant' Narendra Modi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघाने साधला नरेंद्र मोदींवर निशाणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारतीय जनता पक्षानंतर संघाने आता गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. संघाचे मुखपत्र 'पांचजन्‍य'मध्‍ये मोदींच्‍या कार्यशैलीवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहेत. भाजपमध्‍ये पंतप्रधान पदाचे अनेक उमेदवार असल्‍याचे संकेत संघाने दिले आहेत. 'भाजप समोरील आव्‍हाने' या नावाने पांचजन्‍यच्‍या ताज्‍या अंकात संघाचे विचारक देवेंद्र स्‍वरूप यांनी हा लेख लिहिला आहे. यालेखात संजय जोशी प्रकरणापासून मोदींवरही टीका करण्‍यात आली आहे.
संजय जोशी प्रकरणी मोदींना आपली नाराजी सार्वजनिक करायला नाही पाहिजे होते, असे स्‍वरूप यांनी लेखात म्‍हटले आहे. जोशींवर मोदी का नाराज आहेत याची आम्‍हाला माहिती नाही. फक्‍त आम्‍हाला इतकेच माहित आहे की, मोदी आणि जोशी हे संघाचे प्रचारक आहेत. संघाच्‍या प्रती श्रद्धा असतानाही मोदी आपले सहकारी जोशींप्रती इतके नाराज का आहेत, हे एक कोडे बनले आहे. अशामुळे मोदी सर्वांना घेऊन पुढे जात नाही, असा संदेश भाजपच्‍या विरोधकांपर्यंत जातो.
जोशींच्‍या राजीनाम्‍यानंतर मोदी मुंबई येथे झालेल्‍या भाजपच्‍या राष्‍ट्रीय कार्यकारिणीमध्‍ये सामील झाले होते. एक दिवस आधी भाजपचे मुखपत्र 'कमल संदेश'मध्‍ये राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्‍या बैठकीदरम्‍यान मोदींच्‍या कृत्‍यावर कठोर टीका करण्‍यात आली होती. त्‍यांना संयमाने आणि शिस्‍तीत राहण्‍याचा सल्‍ला देण्‍यात आला होता.
मोदी राजवटीपेक्षा आणीबाणी बरी!
नरेंद्र मोदी की आडवाणी?