आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एनआरएचएम घोटाळा : यूपीत सीबीआयचे छापे, दोन माजी मंत्र्यांविरोधात गुन्हे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - उत्तर प्रदेशातील हजारो कोटींच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य (एनआरएचएम) घोटाळा प्रकरणात सीबीआयने शनिवारी दोन माजी मंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे सीबीआयने अनेक ठिकाणी छापे टाकून तपासाचा वेग वाढवला आहे.
100 मुख्य वैद्यकीय अधिकाºयांची 72 जिल्ह्यात करण्यात आलेल्या नियुक्ती प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. प्रत्येक मुख्य वैद्यकीय अधिकाºयाच्या नियुक्तीसाठी 15 ते 20 लाखांची लाच देण्यात येत होती. ही लाच उत्तर प्रदेशचे तत्कालीन कुटुंब कल्याणमंत्री बाबूसिंग कुशवाह व आरोग्यमंत्री अनंत मिश्रा यांना देण्यात येत होती. त्यासाठी एक दलाल काम करत होता, असे सूत्रांनी सांगितले.
कुशवाह व मिश्रा यांच्याविरुद्ध सीबीआयने गुन्हा दाखल केला. त्यांच्यासोबतच मुख्य सचिव प्रदीप शुक्ला, दलाल रशीद मलिक, गिरीश मलिक, माजी आमदार अशोक कटियार, आर. पी. जयस्वाल यांच्या लखनऊ व कानपूर येथील घरांवर सीबीआयने छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
एनआरएचएम योजनेत गैरव्यवहार करण्यासाठी कुशवाह व शुक्ला यांनी आपल्या विभागाच्या यंत्रणेचा गैरवापर केल्याचे सीबीआयला तपासात आढळून आले आहे. सीबीआयची कारवाई शनिवारी पहाटे चार वाजता सुुरू झाली. सीबीआयच्या अनेक टीम विविध भागात गेल्या होत्या. आता कोणत्याही क्षणी सीबीआय अनंत मिश्रा यांना अटक करू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
हजारो कोटींच्या या घोटाळ्यात सीबीआयने आतापर्यंत अनेकांची चौकशी केली. 100 मुख्य वैद्यकीय अधिकाºयांच्या नियुक्तीमध्ये गैरव्यवहार झाला. विशिष्ट व्यक्तींची या पदावर नियुक्ती झाल्याचा आरोप आहे. कुशवाह व शुक्ला यांनी यासंदर्भातील एक प्रस्ताव तयार केला तो त्याच दिवशी मुख्यमंत्री मायावती यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला होता, असे तपास स्पष्ट झाले आहे. या नियुक्ती
प्रक्रियेत नियमांना बाजूला ठेवून व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे.
तेरा गुन्हे दाखल
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेमध्ये (एनआरएचएम) झालेल्या हजारो कोटींच्या घोटाळ्याचा तपास करणाºया सीबीआयने आतापर्यंत 13 गुन्हे दाखल केले आहेत. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. लवकरच आणखी तीन गुन्हे दाखल करण्याची तयारी सीबीआयने केल्याचे सूत्रांनी सांगितले.
एनआरएचएम घोटाळा; अभियंत्याची आत्महत्या
एनआरएचएम घोटाळ्यातील आणखी एका आरोपीच्‍या आत्‍महत्‍येने खळबळ
एनआरएचएम घोटाळा 5 हजार कोटींचा, कॅगचा सनसनाटी अहवाल