आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनआरएचएम घोटाळा 5 हजार कोटींचा, कॅगचा सनसनाटी अहवाल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन (एनआरएचएम) अंतर्गत उत्तर प्रदेशातील डझनभर जिल्ह्यांत पाच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा ठपका नियंत्रक तथा महालेखा परीक्षक (कॅग) यांनी आपल्या अहवालातून ठेवला आहे. या योजनेसाठी राज्याला 8 हजार 657 कोटी रुपये मिळाले होते; परंतु राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाच हजार कोटींचा हिशेब नाही, असे कॅगने म्हटले आहे.
शासनाकडे नोंदणी नसलेल्या समित्यांकडून ही रक्कम हस्तांतरित करण्यात आली. सुमारे 1 हजार 170 कोटी रुपयांची कंत्राटे ही निविदा काढण्याच्या नियमांचे उल्लंघन करून देण्यात आली. कंत्राटे देण्याचे निर्णय प्रमुख सचिव स्तरावरील अधिकारी करत होता. वास्तविक कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत समान पातळीवरील तीन अधिकाºयांना सहभागी करून घेणे अनिवार्य आहे; परंतु त्या नियमाला हरताळ फासण्यात आला, असे कॅगने म्हटले आहे.
दुसरीकडे राज्यातील दोन मुख्य शल्यचिकित्सक अधिकारी सीएमओ डॉ. व्ही.के. आर्य व बी. पी. सिंह यांची हत्या व सीएमओ वाय. एस. सच्चान यांचा संदिग्ध मृत्यू यामुळे हा घोटाळा उघड झाला होता. आर्य यांचा 2010 मध्ये, सिंह यांचा मागील वर्षी मृत्यू झाला. दोघांचीही हत्या झाली. सच्चान जिल्हा तुरुंगात संशयित अवस्थेत मृत आढळून आले होते. सच्चान हत्येचा तपास सीबीआय करत आहे.