आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनजीओ’ वर वरवंटा, आंदोलक जर्मन नागरिकाची हकालपट्टी

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कुडानकुलम अणू प्रकल्पाच्या मुद्द्यावर सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. प्रकल्पाला विरोध करणा-या चार एनजीओंवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आंदोलकांना मदत करणा-या एका जर्मन नागरिकाची मायदेशी रवानगी केली आहे.
परदेशी योगदान नियमन कायद्याचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात चार एनजीओंवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती गृह सचिव आर.के. सिंह यांनी मंगळवारी दिली. ही कारवाई पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या स्पष्टीकरणानंतर काही दिवसांतच करण्यात आली. काही खासगी संघटनांना परदेशातून पाठिंबा मिळत आहे. या मदतीवर ते अशी आंदोलने करत आहेत. गृह मंत्रालयाच्या तपासानंतर चारही एनजीओंची बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
आंदोलकांच्या मदतीसाठी या निधीचा वापर करण्यात आला आहे, असा आरोप या एनजीओंवर ठेवण्यात आला आहे. वास्तविक हा निधी सामाजिक कामासाठी वापरणे आवश्यक होते, असे सरकारचे म्हणणे आहे. एनजीओ विरोधातील हे गुन्हे तामिळनाडू पोलिसांची गुन्हे शाखा, केंद्रीय तपास पथक, सीबीआय यांनी दाखल केले आहेत. तत्पूर्वी तामिळनाडू पोलिसांनी एका जर्मन नागरिकाला ताब्यात
घेतले. नागरकोइल येथे त्याला पकडण्यात आले.
आंदोलकांना मदत केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. देशाची वीज गरज दिवसेंदिवस वाढू लागली आहे; परंतु एनजीओंना याच्याशी काही देणे-घेणे नाही, असे पंतप्रधान डॉ. सिंग यांनी एका सायन्स नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. कुडानकुलमविरोधी आंदोलनसाठी परदेशी पैशाचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाली असल्याचे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी म्हटले आहे. अपंग, कुष्ठरोग निवारणासाठी या एनजीओ परदेशातून पैसा आणत आहेत; परंतु त्याचा वापर मात्र भलत्याच कामासाठी केला जात असल्याचा आरोप सामी यांनी केला.

पर्यटक म्हणून आला...
सोन्नटेग रिनर हर्मेन असे या जर्मन नागरिकाचे नाव आहे. 49 वर्षीय हर्मेनला कुडानकुलमविरोधात निदर्शकांवर देखरेख ठेवणा-या पोलिसांनी पकडले. या पोलिसांना केंद्रीय तपास संस्थेने अ‍ॅलर्ट दिला होता. हर्मेन हा पर्यटक म्हणून भारतात आला होता; परंतु त्याने व्हिसा नियमांना तिलांजली देत निदर्शकांना मदत केली होती. त्यानंतर त्याचा पोलिसांनी शोध घेतला. हर्मेनचे नागरकोइल येथे काहीही काम नव्हते. त्याने व्हिसाच्या सर्व नियमांचे उल्लंघन केले. त्यामुले त्याला जर्मनीला परत पाठवण्यात आल्याचे एका अधिका-याने सांगितले.

पंतप्रधानांना नोटीस
चेन्नई । प्रकल्पाला विरोध करणा-या आंदोलक, संस्थांना परदेशातून पैसा मिळतोय असा आरोप केल्याबद्दल कुडानकुलम जनसंघर्ष समितीचे निमंत्रक एस.पी. उदयकुमार यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना नोटीस धाडली आहे.पंतप्रधानांचे वक्तव्य निराधार आहे. मनमोहनसिंग यांच्या वक्तव्यामुळे लोकांमधील आपल्या प्रतिमेला तडा गेला आहे. पंतप्रधान आपल्या वक्तव्यामध्ये सुधारणा करतील अशी अपेक्षा आहे.अन्यथा क ायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा उदयकुमार यांनी नोटिशीत दिला आहे.