आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता आणि 1500 किलो मीटरपर्यतची मारक क्षमता असलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून भारताने आपल्या अण्वस्त्रसज्जतेच्या दिशने रविवारी महत्त्वाचे पाऊल टाकले. बंगालच्या उपसागरात पाण्याखाली ही चाचणी घेण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या दुस-या च दिवशी भारताने हे यश मिळवले. या चाचणीमुळे जमीन, हवा आणि समुद्रावरून अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेली क्षेपणास्त्रे डागण्याच्या भारताच्या क्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. संपूर्ण भारतीय बनावटीच्या पाण्याखालील क्षेपणास्त्राच्या श्रेणीतील ही पहिल्याच क्षेपणास्त्राची चाचणी होती. मध्यम मारक क्षमतेच्या के-5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची पाण्याखालून यशस्वी चाचणी करण्यात आली. ही चाचणी सर्व मानकांवर तंतोतंत उतरल्याचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) प्रमुख व्ही.के. सारस्वत यांनी सांगितले.

प्रथम न वापरण्याचे धोरण
अण्वस्त्रांचा पहिल्यांदा वापर करायचा नाही, असे भारताचे धोरण आहे. मात्र के-5 क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे प्रत्त्युरादाखल हल्ला करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली असून ख-या अर्थाने भारताने लष्करी सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू केल्याचे संरक्षण तज्ज्ञांनी म्हटले आहे.

पूर्व युरोप-आफ्रिका व ऑ स्ट्रेलिया टप्प्यात
19 एप्रिल 2013 रोजी भारताने 5000 किलो मीटरपेक्षाही जास्त मारक क्षमता असलेल्या अग्नी-5 या आंतर उपखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करून चीनलाही आपल्या टप्प्यात आणले होते. या चाचणीमुळे पूर्व युरोप, पूर्व आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा किनाराही भारताच्या मारक टप्प्यात आला आहे.