आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेल्वे आरक्षणात घोटाळ्याचा कळस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरत- रेल्वे आरक्षणात सक्रिय असलेल्या दलालांनी पाच हजार रुपयांच्या बदल्यात दोन तिकीटे कन्फर्म करून दिल्याचा प्रकार सुरत येथे घडला. विशेष म्हणजे ही दोन्ही तिकीटे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नावाने घेण्यात आली होती.

12 फेब्रुवारीच्या प्रवासाची ही तिकीटे 11 फे ब्रुवारी रोजी काढण्यात आली. दिल्लीहून मुंबईस येणा-या राजधानी एक्स्प्रेसचे हे तिकीट होते. या दोन्ही तिकीटांचा प्रतीक्षा यादी क्रमांक अनुक्रमे 44 व 45 होता. तिकिटांवर राहुल गांधी आणि पी. के. बन्सल या नावांचा स्पष्ट उल्लेख होता. ही कन्फर्म करण्याबाबत दलालांकडे सुरत येथे विचारणा होताच, दलालांचे नेटवर्क सक्रिय झाले. सुरत येथे बसल्याबसल्या दलालांनी दिल्लीत थेट रेल्वे मंत्रालयात चक्रे हलवली आणि प्रत्येक तिकिटामागे 2500 रुपये असे एकूण 5000 रुपये घेऊन दोन्ही तिकिटे कन्फर्म करून दिली. रेल्वे मंत्रालय कोट्यातून ही तिकिटे कन्फर्म केली.