आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओबामा, स्यू कीचे आत्मचरित्र यावर्षात येणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पुस्तकप्रेमींना यावर्षामध्ये वाचनाची मोठी मेजवाणी मिळणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या अ‍ॅन सॅन स्यू की यांची आत्मचरित्रे यावर्षी बाजारात येणार आहेत.
कादंबरीकार जेफरी आर्चर आणि शोभा डे यांच्या कादंब-याही यावर्षी प्रकाशित होणार आहेत.
पेंग्विन इंडिया प्रकाशनाचे ‘मॅन ऑफ द वर्ल्ड’ हे बराक ओबामा यांच्यावरील आत्मचरित्र प्रसिद्धीच्या तयारीत आहे. पुलित्झर पारितोषिक विजेते पत्रकार डेव्हिड मारनिस ओबामांच्या चरित्राचे लेखक आहेत. राजकारण, व्यावसायिक आणि बॉलीवूडच्या संबंधांवर प्रकाश टाकणारी शोभा डे यांची ‘सेठजी’ ही कादंबरी यावर्षातच वाचकांच्या हाती पडणार आहे. पुलित्झर विजेते अमेरिकी पत्रकार कॅथरिन बू यांची मुंबईच्या झोपडपट्टीवरील कादंबरी यावर्षांत प्रकाशित करण्यात येणार आहे. गुरुचरण दास यांचे ‘इंडिया ग्रोव्ह अ‍ॅट नाइट’ आणि ‘द मॅन विदिन माय हेड’ हे पिको आय्यर यांची पेंग्विन प्रकाशनाची पुस्तके काही महिन्यांच्या अवधीत वाचकांच्या हाती पडणार आहे. रोन्दा बायरन यांचे ‘द मॅजिक’ हे सिमन अ‍ॅँड सुस्टर इंडिया या प्रकाशनाच्या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू आहे.