आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल दरवाढीचे वास्‍तव आणि फसवणूकः 9 दिवसांत 135 कोटींचा फायदा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इंधन दरवाढीच्या विरोधात देशभरात असंतोष प्रकट झाल्यानंतर सरकारने इंधनच्या किंमतीत लिटरमागे दोन रुपयांनी कपात केल्याची घोषणा केली होती. परंतु पेट्रोलचे दर वाढल्यापासून नऊ दिवसांच्या काळात इंधन कंपन्यांनी 135 कोटींची कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. कंपन्यांना तोटा होत असल्याचे कारण पुढे करुन पेट्रोलचे भाव वाढवणात आले. सरकारनेही त्यास परवानगी दिली. परंतु त्यासाठी कंपन्यांनी व सरकारने पुढे केलेली आकडेवारी बनावट असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
केंद्रीय मंत्र्यांचीही नाराजी
पेट्रोलियम कंपन्या नुकसान होत असल्याची ओरड केलेली असली तरी ती खोटी असल्याने सरकारमधील मंत्र्यांनीही त्याविरोधात नाराजी प्रकट केली आहे. केंद्रीय मंत्री वायलर रवी यांनी पेट्रोलियम मंत्री एस. जयपाल रेड्डी यांना याबाबत पत्र लिहिले आहे. त्यात तेल कंपन्यांना नफा होत असून नुकसानीचे वृत्त चुकीचे आहे. कंपन्यां त्यांच्या वेतनाचा खर्च जनतेकडून वसूल करत आहेत व पैशाचा गैरवापर करत आहेत. त्यामुळे भविष्यात दर वाढवताना पहिल्यांदा या तथ्यांचा बारकाईने अभ्यास करावा, अशी सूचना वायलर रवी यांनी केली आहे.

यासाठीच केली इंधन दरकपात
- किंमत वाढवण्याच्या निर्णयास मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले असून त्या ठिकाणी सरकारला उत्तर द्यावे लागणार आहे.
- भाजपच्या नेतृवाखाली रालोआ व डाव्या पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात 31 मे रोजी भारत बंद पाळला होता.
- सरकारमधील घटक पक्ष द्रमुक व तृणमूल काँग्रेस नाराज होते. सपानेही विरोध केला होता.

तेव्हा रुपयाचे निमित्त
- तेल कंपन्यांनी दर वाढवताना रुपया कमजोर झाल्याने दर वाढवले पाहिजेत, असे म्हटले होते. त्यावेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 53.17 होती
वस्तुस्थिती : रुपया आजही कमजोरच आहे. शुक्रवारी याची किंमत 55.54 इतकी होती. तेव्हाच्या तुलनेत तो डॉलरपेक्षा 2.37 रुपयांनी कमजोर आहे.

कंपन्यांनी एवढे कमावले
- तेल कंपन्यांनी प्रतीलिटर 6.28 रुपयांची वाढ केली. दररोज 2400 लिटरचे 10 हजार टँकर खपतात. म्हणजे नऊ दिवसांत कंपन्यांनी 135.64 कोटींची कमाई केली.
- वेगवेगळ्या राज्यांत व्हॅटचे दर वेगवेगळे आहेत. 15 (पुद्दुचेरी) ते 33 (आंध्र प्रदेश) असे ते प्रमाण आहे. कमीत कमी व्हॅट असलेल्या राज्यांपासून अधिक व्हॅट असणा-या राज्यांनी या कालावधीत 20 ते 45 कोटींची कमाई केली.
- केंद्र सरकार प्रती लिटर पेट्रोलवर 14.78 रुपये टॅक्स वसूल करते. केंद्राने यावर थेट नफा कमावला नाही. परंतु या काळात कंपन्यांचा नफा वाढल्याने त्यांना सरकारला भरपाई द्यावी लागली नाही. सरकारची 135 कोटींची बचत झाली.

तर मग नेमकी वस्तुस्थिती आहे तरी काय?
सरकार फायद्याच्या हिशेबाने स्वत: किंमत निश्चित करते. कंपन्या आकड्यांच्या मोहजालात जनतेची दिशाभूल करतात. ते दर वाढवण्यासाठी त्या नुकसानीची ढाल पुढे करतात. कंपन्यांनी घोषित केलेल्या आर्थिक परिणामांनी हेच सत्य समोर आले आहे.

- इंडियन आॅइलला 2011 - 12 च्या चौथ्या तिमाहीत 12670.43 कोटींचा शुद्ध नफा झाला. गेल्या वर्षीच्या नफ्याच्या तुलनेत हा आकडा 400 % अधिक आहे.
- 31 मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत भारत पेट्रोलियम कंपनींचा शुद्ध नफा चारपटीने वाढल्याचे नमूद केले आहे. कंपनीला 3, 962,83 कोटींचा फायदा झाला आहे.
पेट्रोल मिळते 3 ते 18 रुपये लिटर!
डिझेल-गॅसचे दर लगेच वाढवा: सी. रंगराजन यांचा सल्ला
कच्‍च्‍या तेलाचे बाजारातील वास्‍तवः सरकार दरवाढ घेईल का मागे?
कच्‍च्‍या तेलाने गाठली पाच महिन्‍यातील सर्वात नीचांकी पातळी
पेट्रोल दरवाढीवर उत्तर द्याः उच्‍च न्‍यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश