आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Oil Companies Increase Rates Of Petrol And Diesel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्‍हा एकदा महागाईचा बॉम्‍ब कोसळला; पेट्रोल दीड रुपया, तर डिझेल 45 पैशांनी महागले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोल लिटरमागे 1.50 रुपयांनी, तर डिझेल 45 पैशांनी महाग झाले. नवे दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले. तेल कंपन्यांना मिळालेल्या अंशत: नियंत्रणमुक्तीचा आधार घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाचे दर भडकल्याचे कारण तेल कंपन्यांनी दरवाढीमागे दिले.

कंपन्यांनी वाढवलेल्या दरात व्हॅट आणि स्थानिक कराचा समावेश नाही. या करामुळे प्रत्यक्ष खिशाला अधिक झळ बसणार आहे. या आधी 18 जानेवारी रोजी पेट्रोलचे भाव लिटरमागे 30 पैशांनी कमी, तर डिझेलचे भाव 51 पैशांनी वाढवण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाचे भाव प्रतिबॅरल 109.08 डॉलरवरून 113.24 डॉलर झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने सांगितले. तसेच गॅसोलिनचे आंतरराष्ट्रीय भाव 119.59 डॉलर प्रतिबॅरलवरून 128.57 डॉलरवर पोहोचल्याने दरवाढ अपरिहार्य होती, असे इंडियन ऑइलने स्पष्ट केले.

तोटा कमी करण्यासाठी सरकारने जून 2010 मध्ये पेट्रोलवरील नियंत्रण उठवले. त्यानंतर आतापर्यंत 20 वेळा पेट्रोलची दरवाढ करण्यात आली आहे.