आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक विजेत्या विजयकुमारला प्रमोशन; सुभेदारहून बनला मेजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंडन ऑलिम्पिकचा रौप्यपदक विजेता नेमबाज विजयकुमारला सेना दलात प्रमोशन मिळाले आहे. 16 डोगरा रेजिमेंटचा सुभेदार विजयला आता मेजर बनवण्यात आले आहे. सेनाप्रमुख जनरल विक्रमसिंग यांनी गुरुवारी विजय आणि ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सेनेच्या 13 खेळाडूंना सन्मानित केले. विजयला या वेळी 30 लाखांचा चेकही देण्यात आला. पदक जिंकल्यानंतर सेना दलकडून विजयला 15 लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. उर्वरित 15 लाख रुपये आधीच्या पुरस्कारांची शिल्लक रक्कम होती.
अखेर न्याय मिळाला : अखेर मला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया या वेळी विजयने व्यक्त केली. मी चार वर्षांपासून माझ्या नगर बक्षीस रकमेची प्रतीक्षा करीत होतो. शिवाय प्रमोशन मागच्या वर्षीपासून प्रलंबित होते. ऑलिम्पिक मेडल जिंकल्यानंतर विजयने प्रमोशन न झाल्यास सेना सोडण्याची धमकी दिली होती. मात्र, नंतर त्याने हे वृत्त नाकारले.
एक कोटी आणि हिमाचल गौरव पुरस्कार : हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांनी बुधवारी विजयला सन्मानित केले. त्याला हिमाचल गौरव आणि एक कोटी रुपयांचा चेक देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी विजयला एक प्लॉटसुद्धा दिला.