आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Om Prakash Chautala And His Son Ajay Chautala Sentenced To 10 Years In Jail

चौटाला पिता-पुत्रांना 10 वर्षे तुरुंगवास, समर्थकांनी न्‍यायालयात फेकले गावठी बॉम्‍ब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- हरियाणाचे माजी मुख्‍यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि त्‍यांचे पुत्र अजय यांना 10 वर्षांची शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे. तीन हजार शिक्षकांच्या भरतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला, त्‍यांचा मुलगा आणि इतर 53 जणांना विशेष सीबीआय न्‍यायालयाने दोषी ठरविले. त्‍यांना आज शिक्षा सुनावण्‍यात आली. याशिवाय इतर तीन मुख्‍य आरोपी संजीव कुमार, विद्याधर आणि शेर सिंग बादशामी यांनाही प्रत्‍येकी 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठाविण्‍यात आली आहे. शिक्षा सुनावल्‍यानंतर चौटाला समर्थकांनी न्‍यायालय परिरात पोलिसांवर दगडफेक केली. तसेच गावठी बॉम्‍बही फेकल्‍याचे वृत्त आहे.

हरियाणा राज्याचे चार वेळा मुख्‍यमंत्री राहिलेले ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे चिरंजीव आमदार अजय चौटाला यांच्यासह 55 जणांविरुद्ध तीन हजार शिक्षकांच्या भरती घोटाळ्यात दोषी आढळल्याचे दिल्लीतील रोहिणी या सीबीआयच्या विशेष न्‍यायालयाने जाहीर केले. हरियाणा राज्यात तीन हजारांहून अधिक जूनियर बेसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षकांची गैरव्यवहार करुन भरती करण्यात आली. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या. हा घोटाळा त्‍यावेळी खुप गाजला होता.