आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Om Prakash Chautala Convicted In Bogus Teacher Scam

शिक्षक भरती घोटाळा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटालांना पुत्रासह अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन हजार शिक्षकांच्या भरतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला, त्‍यांचा मुलगा आणि इतर 53 जणांना विशेष सीबीआयन्‍यायालयाने आज दोषी ठरविले. त्‍यांना 22 जानेवारीला शिक्षा सुनावण्‍यात येणार आहे. न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिल्यानंतर चौटाला यांच्यासह इतर दोषींना अटक करण्यात आली. हरियाणाचे मुख्यमंत्री असताना 1999 ते 2000 या काळात चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केली होती. या प्रकरणी सीबीआयने चौटाला आणि इतरांविरुद्ध 6 जून 2008 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. आज न्‍यायालयाने निर्णय दिला.
हरियाणा राज्याचे चार वेळा मुख्‍यमंत्री राहिलेले ओमप्रकाश चौटाला आणि त्यांचे चिरंजीव आमदार अजय चौटाला यांच्यासह 55 जणांविरुद्ध तीन हजार शिक्षकांच्या भरती घोटाळ्यात दोषी आढळल्याचे दिल्लीतील रोहिणी या सीबीआयच्या विशेष कोर्टाने आज जाहीर केले. हरियाणा राज्यात तीन हजारांहून अधिक जूनियर बेसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षकांची गैरव्यवहार करुन भरती करण्यात आली. त्यात मोठा गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी होत्या.
स्‍पेशल जज विनोद कुमार यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ओमप्रकाश चौटालासह इतर 55 जणांवर सबळ पुराव्याद्वारे आरोप सिद्ध झाले आहेत. सर्व आरोपींना दोषी असल्याचे जाहीर करण्यात येत आहे. तसेच त्यांना ताब्यात घेऊन तुरुंगात डांबावे.
कोर्टाच्या आदेशानंतर ओमप्रकाश चौटाला, अजय चौटाला, त्यांचे राजकीय सल्लागार शेरसिंग बडशामी, माजी आयएएस अधिकारी संजीव कुमारसह इतर सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता त्यांना सरळ तुरुगांत पाठविण्यात येणार आहे.
स्‍पेशल जज यांनी पहिल्या (क्रमांक एकचा आरोपी ते 20 पर्यंत) 20 आरोपींना 17 जानेवारीला शिक्षा सुनविण्यात येणार आहे. तर, आरोपी क्रमांक 21 ते 40 मधील आरोपींना 19 जानेवारीला आणि उर्वरित दोषींना 21 जानेवारीला शिक्षा सुनावली जाईल.
हरियाणा राज्यात हा घोटाळा खूप गाजला तसेच चर्चेत राहिला. कोर्टाच्या आदेशानुसार सर्व आरोपी आणि दोन्ही पक्षांचे वकील सकाळी 10 वाजताच कोर्टात पोहचले होते. चौटाला पिता-पुञही कोर्टात हजर होते. या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देषानुसार दिल्लीतील रोहिणी या विशेष कोर्टात सुरु होती. अखेर कोर्टाने आज चौटालासह त्यांचे चिरंजीव व इतर अधिका-यांना आयपीसी आणि भ्रष्‍टाचारविरोधी कायद्यातंर्गत दोषी धरले आहे.