आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आसाम मधील हिंसाचारात 20 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी/ गोलपारा ; आसामच्या गोलपारा जिल्ह्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक मतदानादरम्यान उसळलेल्या हिंसाचारात 20 जण ठार झाले आहेत. हिंसाचार रोखण्यासाठी प्रशासनाने दिसताक्षणी गोळ्या घालण्याचे
आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस करणार असल्याचे म्हटले आहे.

गोलपारा जिल्ह्यात पोलिस गोळीबारात 12 आगीत एक तर हिंसाचारामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गोगोई यांनी दिली. मंगळवारी हिंसाचार उफाळून आल्यानंतर कृष्णाई व मोरनोई भागात बेमुदत काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य सरकार सीबीआय चौकशीची शिफारस करेल, प्रशासनातील दोष शोधण्यासाठी न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, असे गोगोई म्हणाले. हिंसाचारामध्ये पोलिस, सीआरपीएफचे 30 जवान व 70 नागरिक जखमी झाले आहेत. मंगळवारी रात्री 11.30 वाजता हिंसक घटनेची नोंद झाल्यानंतर बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. परिस्थिती चिघळण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. त्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, असे गोगोई यांनी स्पष्ट केले.

मतदानावेळी उसळला हिंसाचार
राभा हसॉँग स्वायत्त जिल्हा परिषद गटातील मतदानादरम्यान एका जमावाने मंगळवारी मतदान केंद्रावर हल्ला चढवून ते बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गोलपारा जिल्ह्यात कृष्णाई व मोरनोई तसेच कामरूप ग्रामीण जिल्ह्यातील काही भागांत हिंसाचार उसळला. हिंसाचारात जमावाने अनेक घरांना आग लावली.