आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीत बलात्काराच्या रोजच्या घटना कायम; चिनी मुलीवर गँगरेप

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी दिल्लीत एक सामूहिक बलात्कार आणि तीन इतर बलात्काराचे गुन्हे पुढे आले आहेत.
सामूहिक बलात्काराची घटना स्वरुपनगरमधील असून संबंधित मुलगी चीनची आहे. तर, शकरपूरमध्ये एका दुकानदार मालकाने आपल्या इमारतीत भाड्याने राहणा-या एका कुटुंबातील १६ वर्षीय मुलींवर बलात्कार केल्याचे उघड झाले आहे.

ज्या परदेशी मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचे सांगण्यात येत आहे ती मुलगी गुडगावमधील एका कंपनीत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करण्यासाठी आली आहे. पीडित मुलीचे वय 23 वर्षे असून, ती चीनची नागरिक आहे. संबंधित मुलगी एका पार्टीत गेली होती. तेव्हा तिचा मित्र तारिक शेख हा तिच्याबरोबर होता. तो इव्हेंट मॅनेजर असून, संबंधित मुलीची आणि त्याची जुनी ओळख आहे. पार्टीत संबंधित मुलीने दारू घेतली होती. त्यानंतर तिचा मित्र तारिक याने तिच्यावर त्याच्या आणखी तीन मित्रांसह एका घरी बलात्कार केला. पोलिसांनी तारिकला अटक केली आहे. तसेच त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीच्या हौज खास पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.