आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Once Again Pak Illegally Enter In India; Bullet Firing On Pak Solider

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय सरहद्दीत पुन्हा पाकची घुसखोरी ; पाक सैन्यावर गोळीबार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच शुक्रवारी अशाच एका घटनेत घुसखोरी करणा-या पाकिस्तानी सैनिकाला भारतीय जवानांनी गोळ्या घातल्या जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात नियंत्रण रेषेवर ही घटना घडली.

भारतीय सरहद्दीत घुसून दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या केल्याच्या एक महिन्यानंतर ही घटना घडली. पाकिस्तानी लष्कराने मृत जवानाची ओळख स्पष्ट केली असून त्याचा मृतदेह देण्याची भारताकडे मागणी केली आहे. नौशेराच्या नियंत्रण रेषेवर काही हालचाली झाल्याचे दिसून आले आहे. मृत जवानाकडून एके-47 जप्त करण्यात आली आहे. लष्करी कारवाईत ठार झालेल्या पाकिस्तानी जवानाचा मृतदेह त्याच्या देशाच्या विनंतीवरून परत पाठवण्यात येईल, असे लेफ्टनंट जनरल विनोद भाटिया यांनी सांगितले. कृष्णा घाटीमध्येही शुक्रवारी अशाच प्रकारे शस्त्रसंधीच्या उल्लंघनाची घटना समोर आली आहे; परंतु त्यात कसलीही हानी झाल्याचे वृत्त नाही.