आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंवरीला जाळण्‍यात मदत करणा-या अशोक बिश्‍नोईचे आत्‍मसमर्पण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर - भंवरीदेवी हत्या प्रकरणी फरार असलेल्‍या अशोक बिश्‍नोईने आज आत्‍मसमर्पण केले आहे. तो बिश्‍नाराम गँगचा सदस्‍य असून भंवरीला जाळण्‍यामध्‍ये त्‍याने मदत केल्‍याचा त्‍याच्‍यावर आरोप आहे.
भंवरीदेवीचे अपहरण करुन हत्‍या केल्‍यानंतर तिचा मृतदेह जाळण्‍यात आला. त्‍यानंतर पुरावे नष्‍ट करण्‍यासाठी राख कालव्‍यात फेकून देण्‍यात आली. याप्रकरणी बिश्‍नाराम गँगचा हात होता. बिश्‍नाराम गँगने माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि आमदार मलखानसिंह बिश्‍नोई यांच्‍या इशा-यावरुन भंवरीची हत्‍या केल्‍याचा आरोप आहे. या गँगच्‍या चार सदस्यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. अशोक बिश्‍नोई हा बिश्‍नारामचा भाऊ आहे. दरम्‍यान, सीबीआयने बिश्‍नाराम आणि कैलाश जाखड यांची कोठडी वाढविण्‍याची मागणी केली होती. ती मान्‍य करुन न्‍यायालयाने कोठडीत 2 दिवसांची वाढ केली आहे. तसेच मलखानसिंह आणि भंवरीचा पती अमरचंद याच्‍यासह 5 जणांची न्‍यायालयीन कोठडी 30 जानेवारीपर्यंत वाढविण्‍यात आली आहे.