आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याची भाववाढ तात्पुरती : शरद पवार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कांद्याच्या दरवाढीमुळे सामान्यांच्या डोळ्यांना पाणी आले आहे. मात्र, ही दरवाढ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचे सांगत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

नाशिक जिल्ह्यात लासलगाव येथील कांद्याच्या घाऊक बाजारपेठेतील भाव 20.50 रुपयांनी वाढला आहे. वर्षभरापूर्वी 3.55 रुपयांनी भाववाढ झाली होती. कांद्याच्या किरकोळ बाजारपेठेत भाववाढ जाणवत आहे. महाराष्‍ट्रा मध्ये दुष्काळामुळे कांद्याच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. मात्र, सध्याची भाववाढ तात्पुरती असून येत्या काही दिवसांत किमती स्थिर होतील, असे पवार म्हणाले. मी कांदा उत्पादक भागाची मंगळवारी पाहणी केली आहे. अन्य भागात कांद्याचे पीक चांगले आहे. येत्या काही आठवड्यांत कांद्याची आवक वाढेल, असे त्यांनी सांगितले.