आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Only Gandhi Family Word Is Last Word In Congress Says Mulayam Singh Yadav

\'कॉंग्रेसमध्‍ये फक्‍त गांधी परिवाराचे चालते\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- कॉंग्रेस पक्षात फक्‍त गांधी परिवाराचे चालते. त्‍यांच्‍यासमोर कोणाचीही तोंड उघडण्‍याची हिंमत नसल्‍याची टीका समाजवादी पक्षाचे अध्‍यक्ष मुलायम सिंग यादव यांनी केली आहे.

कॉंग्रेसच्‍या नेतृत्‍वाखालील युपीए सरकारला बाहेरून पाठिंबा देणा-या मुलायम सिंग यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा करिष्‍मा सध्‍या चालत नसल्‍याचेही म्‍हटले. एका हिंदी वृत्त व‍ाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीत बोलताना मुलायम सिंग म्‍हणाले,'कॉंग्रेसमध्‍ये फक्‍त गांधी परिवाराचे चालते. माझ्या माहितीप्रमाणे त्‍यांच्‍या मिटिंगमध्‍ये कोणत्‍याही नेत्‍याची बोलण्‍याची हिंमतही होत नाही.'

कॉंग्रेसला पाठिंबा देण्‍याविषयी ते म्‍हणाले,' आम्‍ही जातीयवादाविरोधात राहिलो आहोत. विचारधारेच्‍या बाबतीत डावे पक्षच आमच्‍या जवळ आहेत. मात्र, विद्यमान परिस्थितीत कॉंग्रेसला पाठिंबा देण्‍याशिवाय आमच्‍याकडे पर्याय नाही. कारण आम्‍ही समर्थन मागे घेतल्‍यामुळे सरकार पडणार नाही, याची आम्‍हाला जाणीव आहे. मात्र, देशातील सामान्‍य लोकांशी निगडीत एखादा मुद्या समोर आला तर आम्‍ही सरकारचा पाठिंबा कधीही काढू शकतो.'

मुलायम सिंग यांनी युपीए सरकारच्‍या काम करण्‍याच्‍या पद्धतीवर नाराजी व्‍यक्‍त केली. महागाई, बेरोजगारी, शेतक-यांची दयनीय अवस्‍था आणि देशाच्‍या वाईट स्थितीला विद्यमान सरकार जबाबदार असल्‍याचे म्‍हटले. ते म्‍हणाले,'सरकार प्रत्‍येक ठिकाणी असफल होताना दिसते. जेव्‍हा युपीए 2 सरकार सत्तेवर आले होते. तेव्‍हा 100 दिवसांत महागाईवर नियंत्रण मिळवण्‍यात येईल असे वचन देण्‍यात आले होते. मात्र, असे काहीच होऊ शकलेले नाही.'

आपल्‍याविरोधात सीबीआयचा वापर करण्‍यात येत असल्‍याचा आरोपही त्‍यांनी केला. यावेळी मुलायम सिंग यांनी आगामी लोकसभा निवडणुकीनंतर तिसरी आघाडीच सत्तेवर येणार असल्‍याचा विश्‍वास व्‍यक्‍त केला.