आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूल न देताच पाठीत घुसलेला बाण काढला

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मलकानगिरी (ओडिशा) - भूल न देताच पाठीत आरपार घुसलेला बाण काढून एका आदिवासी तरुणाचे प्राण वाचवण्याची किमया ओडिशाच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरने केली आहे. ही अवघड व किचकट शस्त्रक्रिया करण्यार्‍या डॉक्टरचे नाव सपनकुमार धिंडा आहे.
मुदुलीपाडा येथे तीन दिवसांपूर्वी सोमा चालान या बोंडा आदिवासी तरुणाच्या पाठीत एक बाण आरपार घुसला होता.त्याची अवस्था अत्यंत नाजूक होती. मरणाच्या दारात असलेल्या या तरुणाला मलकानगिरीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी भूल देण्याचे औषधच (अ‍ॅनेस्थेशिया)रुग्णालयात उपलब्ध नव्हते. सोमाची तब्येत क्षणाक्षणाला खालावत होती.भूल देऊन बाण काढण्यासाठी त्याला नजीकच्या बेरहामपूर शहरात पाठववयाचे म्हटले तरी अवघड होते.कारण बेरहामपूर हे शहर जवळ म्हटले तरी 500 कि.मी.अंतरावर आहे. तेथील एमकेसीजी शासकीय रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करता आली असती, परंतु सोमाकडे तेवढाही वेळ नव्हता. परिस्थिती अत्यंत विकट होती. त्याला बेरहामपूरला पाठवले असते तर वाटेतच त्याला मृत्यूने गाठले असते, असे डॉ.सपनकुमार यांनी सांगितले. सोमाच्या नाजूक परिस्थितीकडे पाहून अखेर मीच त्याचे प्राण वाचवण्यासाठी आव्हान स्वीकारले, असे ते म्हणाले.
ऑपरेशन थिएटरमध्येच महिलेवर सामुहिक बलात्कार