आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्लीः संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच प्रचंड गदारोळाने झाली. भाजपने स्थगन प्रस्ताव मांडून आसाममधील हिंसाचारावर चर्चेची मागणी केली. त्यावर समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यामुळे विरोधक आक्रमक झाले. दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाल्यामुळे कामकाज दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यानंतर आसामच्या विषयावर चर्चा सुरु झाली.
भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या वक्तव्यानंतर सत्ताधारी जाम भडकले. आसामवरील चर्चेदरम्यान भाषण देत असताना अडवाणींनी, युपीए-2 अवैध आहे, अशी टीका केली. कोट्यवधी रुपये खर्च करुन हे सरकार वाचविण्यात आले आहे. त्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले. याच गदारोळात लोकसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. अडवाणींना हे वक्तव्य मागे घेण्यात यावे, असे अध्यक्ष मीरा कुमार यांच्याकडून सांगण्यात आले. त्यानंतर अडवाणींनी वक्तव्य मागे घेतले. अडवाणींच्या वक्तव्यानंतर युपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधीही संतापल्या. जागेवरच उभे राहून रागात त्या काही तरी बोलल्या. परंतु, गदारोळामध्ये त्यांचे बोलणे नीट ऐकू आले नाही.
आसामसंदर्भात अडवाणी म्हणाले, आसामची स्थिती स्फोटक आहे. केंद्राने या स्थितीची जबाबदारी घेतली पाहिजे. वेळीच उपयाययोजना न केल्यास उद्रेक होईल. सरकारने कायद्याची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे परिस्थिती बिघडली. आसाममध्ये बांगलादेशींच्या घुसखोरीमुळे संकट निर्माण झाले आहे. ही घुसखोरी रोखण्यात सरकारला अपयश आले. किंबहुना मतांच्या राजकारणासाठीच त्यांनी घुसखोरीकडे लक्ष दिले नाही, अशी टीका अडवाणींनी केली.
सरकार सर्व मुद्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. त्यानंतर भाजपने लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला होता. तो लोकसभेच्या अध्यक्ष मीरा कुमार यांनी स्विकारला. यावर आज चर्चा होणार आहे. तर राज्यसभेत भाजपने प्रश्नोत्तराचा तास स्थिगित करुन चर्चेची मागणी केली. भाजप नेते अरुण जेटली यांनी केंद्र सरकारवर टीका करताना म्हटले की, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आसाममध्ये लोकसंख्येचे चित्र बदलले आहे. अवैध मार्गाने बांगलादेशी लोक तिथे विस्थापित होत आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.
नवे सभागृह नेते सुशील कुमार शिंदे यांनी स्पष्ट केले की, सरकार कोणत्याही मुद्यावर चर्चा करण्यास तयार आहे. आमच्याकडे लपविण्यासारखे काहीच नाही. आम्ही मध्यरात्रीपर्यंतही चर्चा करु.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनियुक्त खासदार सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा हे उपस्थित होते. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांनी लोकसभेच्या सदस्य म्हणून शपथ घेतली.
खासदारांना कशासाठी हवे नवे संसद भवन?
'पावसाळी अधिवेशन :‘हसमुख’ गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंची परीक्षा
गौरवशाली निवड (अग्रलेख)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.