आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Over Bridge Collapse At Kolkata Three People Are Injured

कोकात्यात उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला; तीन जण जखमी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता शहरातील उल्टाडांगा परिसरात दीड वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा रविवारी पहाटे तुकडा पडला. पहाटे 4.30 वाजता पूल कोसळल्याने झालेल्या भल्या मोठ्या आवाजाने या परिसरातील नागरिकांची झोप उडवली. या अपघातात तीन जण जखमी झाले. नजरूल इस्लाम अव्हेन्यू आणि विमानतळाला इ. एम. बायपास तसेच पूर्वेकडील व दक्षिणेकडील उपनगरांना जोडणारा हा उड्डाणपूल कोसळला तेव्हा फारशी वाहतूक नव्हती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

कशामुळे कोसळला?
उल्टाडांगा उड्डाणपुलावरून मार्बलने भरलेला ट्रक सुसाट वेगाने जात असताना ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक कर्व्हच्या जोडावर जाऊन धडकल्याने बेसप्लेट्स तुटल्यामुळे उड्डाणपुलाचा मोठा भाग धाडकन कोसळला. या उड्डाणपुलाखालून एक कॅनॉल वाहतो.

हे घडणारच होते
विकासकामाची बतावणी करत माकपचे तत्कालीन मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाईघाईत 2011 च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच या पुलाचे काम करण्यात आले. त्यामुळे कधी तरी हे घडणारच होते.
-फिरहाद हकीम, नगर विकास मंत्री, पश्चिम बंगाल

>7 जुलै 08 मध्ये जेएनएनयूआरएम योजनेअंतर्गत बांधकामास सुरुवात.
>68 कोटी अंदाजित खर्च, परंतु केंद्र व राज्याच्या ताणाताणीत लटकला.
>88 कोटी रुपये उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी एकूण खर्च.
>5 जाने.11 रोजी माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या हस्ते उद्घाटन.
>1.5 वर्षापूर्वी उड्डाणपुलास भेग पडूनही वाहतूक सुरूच होती.