आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कावेरी’वरून कॉँग्रेस, जेडीएसचा गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बंगळुरू - कर्नाटक विधानसभेमध्ये सोमवारी विरोधी पक्ष कॉँग्रेस व जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष)आमदारांनी गोंधळ घातला. कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला सोडण्याच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांच्या आमदारांनी सभात्याग केला. पाणी वाटपावर राज्याची बाजू मांडणारे वकिल फली एस. नरीमन यांना बदलण्याची मागणी कॉँग्रेसने केली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या 7 फेब्रुवारीच्या आदेशानुसार कावेरीचे 2.44 टीएमसी पाणी तामिळनाडूला सोडले आहे. मुख्यमंत्री जगदिश शेट्टार व जलसंपदामंत्री बसवराज बोम्मई यांनी विधानसभेत आपल्या निर्णयाचे समर्थन केले. पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याआधी राज्याची स्थिती भक्कम व्हावी यासाठी नरीमन यांनी राज्य सरकारला पाणी सोडण्याचा सल्ला दिला होता, असे बोम्मई म्हणाले.