आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिर्मल (आंध्र प्रदेश) - विखारी भाषण करणारे एमआयएमचे आमदार अकबरुद्दीन ओवेसींच्या आवाजाचे नमुने मंगळवारी महानगर दंडाधिका-यांसमोर घेण्यात आले. आजारपणामुळे नेमका आवाजाचा नमुना देतानाच ओवेसींचा आवाज बसला. हा नमुना चंदिगडच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीला पाठवला जाईल. दरम्यान, ओवेसीच्या कोठडीत 19 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
आदिलाबाद जिल्ह्यातील निर्मल येथे प्रथमवर्ग न्यायदंडाधिका-यांसमोर मंगळवारी आंध्र प्रदेश फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या तज्ज्ञांनी ओवेसींच्या आवाजाचे नमुने घेतले. ओवेसींना एक स्क्रिप्ट वाचण्यासाठी देण्यात आले. मात्र आजारपणाची तक्रार करणा-या ओवेसींचा आवाज त्या वेळी खूप खोल गेला होता. निर्मल येथे गतवर्षी भाषण देतानाच्या आवाजाची तुलना करता त्यांचा आजचा आवाज खूपच हळू होता, असे पोलिस अधिका-याने सांगितले. मंगळवारी घेण्यात आलेल्या आवाजाचा नमुना आणि वादग्रस्त भाषणाच्या व्हिडिओ फुटेजमधील आवाजाची तुलना व तपासणी चंदिगड येथील केंद्रीय फॉरेन्सिक लॅबमध्ये करण्यात येणार आहे.
आंध्र प्रदेश विधानसभेत ओवेसी एमआयएमचा गटनेता आहे. सध्या तो आदिलाबाद तुरुंगात आहे. विखारी भाषणाच्या व्हिडिओ चित्रफितीमधील आवाज आपला असल्याचे ओवेसीने यापूर्वी चौकशीवेळी फेटाळले आहे. त्यामुळेच निर्मल पोलिसांनी न्यायालयात आवाजाची तपासणी करण्यासाठी याचिका दाखल केली होती.
काय आहे प्रकरण
हैदराबादेतील चंद्रयानगुट्टा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणा-या ओवेसींविरोधात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशिष्ट समुदायाविरोधात विखारी भाषण केल्याप्रकरणी निर्मल, निझामाबाद आणि हैदराबादेतील पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल के ले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.