आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग यापुढे अजामीनपात्र गुन्हा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सगोत्री विवाह करणा-याविरुद्ध खाप पंचायत बोलवत असलेली सभा कायद्याचे सरळ उल्लंघन असल्याचे सांगत या वादातून केला जाणारा हत्येचा गुन्हा अजामीनपात्र ठरविण्यात यावा, असे विधी आयोगाने म्हटले आहे.
खाप पंचायत आणिऑनर किलिंगबाबत( घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी केली जाणारी हत्या) समाजाचे मत अजमावण्यात यावे की नाही यावर आयोगामध्ये मतभिन्नता दिसून आली. खाप पंचायतविरोधी विधेयकाच्या मसुद्यामध्येऑनर किलिंगला अजामिनपात्र ठरवण्यात आले आहे. सत्र किंवा अतिरिक्त सत्र न्यायालयाअंतर्गत अशा प्रकरणांची सुनावणी करण्यात यावी. हायकोर्टाशी विचारविनिमय करून राज्यांनी या खटल्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करावी, असे आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑनर किलिंग गुन्ह्याचा समावेश भारतीय दंड विधानाच्या कलम 300 अंतर्गत करण्यात यावा, असा एक मतप्रवाह आहे. विधी आयोगाने अशा समावेशाची गरज नसल्याचे सांगितले.ऑनर किलिंगची प्रकरणे कलम 300 अंतर्गत घेण्याची आवश्यकता भासत नाही. भारतीय दंड विधानामध्ये अस्तित्वात असलेली कलमे त्यासाठी पुरेशी आहेत, असे विधी आयोगाने म्हटले आहे.
सगोत्री विवाह करणा-या उत्तर भारतातील अनेक जोडप्यांना खाप पंचायतीच्या आदेशामुळे मृत्यूचा सामना करावा लागतो.ऑनर किलिंग हा स्वतंत्र गुन्हा म्हणून नोंद व्हावा यावर दोन वर्षांपूर्वी सरकारी पातळीवर विचार सुरू झाला. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीगटाने या विषयामध्ये लक्ष घातले आहे.