आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'20 रुपयाचे आईस्क्रीम चालते मग तांदुळामागे रुपया सहन होत नाही!'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/बंगळुरू- महागाईबद्दल मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेवर गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी चांगलेच तोंडसुख घेतले. लोक आईस्क्रिम आणि पाण्याच्या बाटलीसाठी 15 रुपये खर्च करतील, पण गहू-तांदुळ रुपयाने महागला तर सहन करू शकत नाहीत, अशा शब्दांत त्यांनी मध्यमवर्गीयांची भलावण केली.
महागाईच्या मुद्दय़ावर त्यांनी सरकारचा बचाव केला. प्रत्येक बाबतीत सरकार मध्यमवर्गीयांचा विचार करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, भाजपचे प्रवक्ते राजीव प्रताप रूडी यांनी चिदंबरम यांच्या वक्तव्यावर टीका करून लोकांचा हा अपमान असल्याचे म्हटले आहे. महागाईला आवर घालण्यात अपयश आल्याने सरकार आात सामान्य लोकांवरच आरोप करत असल्याचे ते म्हणाले. कायम विमानाने प्रवास करणारे, वातानुकुलित घरात राहणारे चिदंबरम सामान्य लोकांची क्रूर थट्टा करत असल्याचे रूडी म्हणाले.
मंत्रिगटाच्या (इगॉम) अध्यक्षपदी आता गृहमंत्री पी. चिदंबरम?
पाकच्या मदतीशिवाय मुंबई हल्ला अशक्य : चिदंबरम
मुंबई हल्ल्यात पाकचा हात असल्याचे ठोस पुरावे : चिदंबरम