आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांची कोलांटउडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मध्यमवर्गीयांची खिल्ली उडवल्यानंतर 24 तासांचा अवधी उलटताच केंद्रीय मंत्री पी.चिंदबरम यांनी आपले वक्तव्य फिरवले. महागाईच्या मुद्यावर मध्यमवर्गीयांची खिल्ली उडवली नव्हती.माझे विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असे चिदंबरम यांनी सांगितले.
काँग्रेस दिशाहीन झाल्याचे वक्तव्य करणाºया कायदामंत्री सलमान खुर्शिद यांनीही दुसºया दिवशी आपल्या विधानबद्दल असाच सूर लावला होता.तर मंगळवारी चिदंबरम यांनी मध्यमवर्गीयांवर टिका केली होती. बुधवारी गृहमंत्रालयाकडून त्याचा खुलासा करण्यात आला.आपले विधानाचा विपर्यास करण्यात आल्यामुळे चिदंबरम यांना धक्का बसला तसेच ते संतापले असल्याचे खुलाश्यात म्हटले आहे. महागाईच्या मुद्यावर केवळ आपले मत व्यक्त के ले होते असे चिदंबरम यांनी म्हटले आहे. दरम्यान, गृहमंत्र्यांच्या विधानावर भाजपने सडकून टिका के ली आहे. लोकांच्या जखमेवर फुंकर घालता येत नसेल तर त्यांना अपमानित तरी करु नका असे रविशंकर प्रसाद म्हणाले.