आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणव मुखर्जींबद्दल सांख्यिकी संस्‍थेकडून चुकीची माहिती?

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/कोलकाता - राष्ट्रपतिपदाचे उमेदवार पी.ए. संगमा यांनी प्रणव मुखर्जी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला आहे. भारतीय सांख्यिकी संस्थेचे (आयएसआय) चेअरमन हे लाभाचे पद भूषवत असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा आरोप संगमा यांनी केला आहे. या वादानंतर निवडणूक आयोगाने अर्जांची छाननी एक दिवस पुढे ढकलली आहे.
आता अर्जाची छाननी 3 जुलै रोजी होणार आहे. दरम्यान, प्रणव मुखर्जी यांनी 20 जून रोजीच आयएसआयच्या प्रमुखपदाचा राजीनामा दिल्याचा खुलासा संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी केला. ते म्हणाले, संगमा यांच्या आरोपानंतर मी आणि गृहमंत्री चिदंबरम यांनी मुखर्जी यांची भेट घेतली. तेव्हा 20 जून रोजीच या पदाचा राजीनामा दिल्याचे मुखर्जी म्हणाले. मंगळवारी दुपारी 3 वाजता मुखर्जी यावर लेखी उत्तर देणार आहेत.
तत्पूर्वी, संगमा यांचे वकील सतपाल जैन यांनी राष्ट्रपती निवडणुकीचे निवडणूक अधिकारी व्ही. के. अग्निहोत्री यांच्याकडे प्रणव मुखर्जी यांची उमेदवारी रद्द करण्याचा मागणी अर्ज दिला.

जैन म्हणाले की, मुखर्जी सध्याही आयएसआयच्या चेअरमनपदी आहेत. हे लाभाचे पद आहे, त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी.

मानद पद होते, राजीनामा 20 जूनलाच दिला
आयएसआयनेही प्रणव मुखर्जी यांनी पद सोडल्याचा खुलासा केला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखर्जी या संस्थेचे मानद अध्यक्ष होते. या पदासाठी त्यांना वेतन मिळत नव्हते. त्यांनी 20 जून रोजी या पदाचा राजीनामा दिला. संस्थेच्या वेबसाइटवर मुखर्जी यांचे नाव चेअरमन म्हणून असल्याचा संस्थेने इन्कार केला आहे. परंतु, दुपारी दोन वाजेपर्यंत वेबसाईटवर प्रणव मुखर्जींचे नाव होते. वाद उघडकीस आल्‍यानंतर साईटवर बदल करण्‍यात आले. याप्रकारावरुन संशय व्‍यक्त करण्‍यात येत आहे.
सोनिया गांधींना द्यावा लागला होता राजीनामा
दुहेरी लाभाच्या पद प्रकरणी कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांना 2006 मध्ये खासदारपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या (एनएसी) प्रमुखपदी असताना त्यांनी निवडणूक लढवली होती. त्यानंतर राजीनामा दिला. नंतर रायबरेली मतदारसंघातून त्या लोकसभेत पोहोचल्या. त्यानंतर दुहेरी लाभ पद कायद्यात दुरुस्ती करुन एनएसीचे प्रमुखाचे पद त्या यादीतून वगळण्यात आले. 2010 मध्ये सोनिया गांधी पुन्हा एनएसी प्रमुख झाल्या.
प्रणव मुखर्जी १३ जुलैला बाळासाहेब ठाकरेंची भेट घेणार
प्रणव मुखर्जी \'भ्रष्‍टाचारी\', टीम अण्‍णांचा आरोप
\'स्‍वत:च्‍या मर्जीने कोणीही राष्‍ट्रपती बनू शकत नाही\'- प्रणव मुखर्जी