आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • P Chidambaram Provided False Statistics About Super Rich Class In India

चिदंबरम यांनी अर्थसंकल्‍पात मांडले चुकीचे आकडे?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यंदाच्‍या अर्थसंकल्‍पात अतिश्रीमंतांवर कर लावण्‍याचा प्रस्‍ताव मांडला आहे. त्‍यासाठी त्‍यांनी अतिश्रीमंतांची काही आकडेवारी दिली. परंतु, या आकडेवारीवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहे. वार्षिक 1 कोटी रुपयांपेक्षा जास्‍त उत्पन्‍न असलेल्‍यांची संख्‍या देशात 42800 एवढी असल्‍याचे चिदंबरम यांनी सांगितले होते. परंतु, प्रत्‍यक्षात हा आडा यापेक्षा कितीतरी पटीने जास्‍त असल्‍याचे दिसून येत आहे.

प्रसिद्ध लेखापरिक्षण संस्‍था केपीएमजीने एक अहवाल सादर केला आहे. त्‍यानुसार भारतात 5.5 कोटी रुपयांपेक्षा जास्‍त गुंतवणूक करणारे 1.25 लाख नागरिक आहेत. साहजिकच त्‍यांच्‍याकडे चलअचल संपत्तीही असेल. त्‍यात घर, गाडी इत्‍यादींचा समावेश असेल. या व्‍यक्तींचे वार्षिक उत्‍पन्‍न 1 कोटी रुपयांपेक्षा कमी असणे शक्‍य नाही.

आणखी एका क्षेत्रातील आकडेवारी चिदंबरम यांच्‍या आकडेवारीला चुकीचे ठरविते. देशात लक्‍झरी कारची विक्री झपाट्याने वाढली आहे. दरवर्षी 27 हजार अतिमहागड्या कार विकल्‍या जात आहेत. त्‍यामुळे हा आकडा 42800 अतिश्रीमंताच्‍या संख्‍येला चुकीचे ठरवितो. चिदंबरम यांचा अर्थसंकल्‍प संभ्रम निर्माण करणारा असून त्‍यांचे अनेक दावे चुकीचे आहेत, असे अर्थतज्‍ज्ञ एस. गुरु‍मुर्ति यांनी सांगितले आहे.