आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्‍काराचा आरोप असणा-या आयपीएस अधिका-याला मिळाला राष्‍ट्रपती पुरस्‍कार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्रजासत्ताक दिनाच्‍या औचित्‍यावर सरकारने घोषित केलेल्‍या विविध पुरस्‍कारांवरून आता वादास सुरूवात झाली आहे. छत्तीसगड पोलिस दलाचे आयजी एसआरपी कल्‍लुरी यांना त्‍यांच्‍या उत्‍कृष्‍ठ कार्यामुळे राष्‍ट्रपती पुरस्‍कार जाहीर करण्‍यात आला आहे. विशेष म्‍हणजे कल्‍लुरी यांच्‍यावर अदिवासी महिलेवर बलात्‍कार केल्‍याचा आरोप आहे.

1994 च्‍या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्‍या कल्‍लुरींनी लेधाबाई नावाच्‍या एका महिलेवर बलात्‍कार तर केलाच शिवाय आपल्‍याबरोबर असलेल्‍या इतर पोलिस कर्मचा-यांनाही तसाच आदेश दिल्‍याचा आरोप आहे.

यापूर्वीच, दक्षिण भारतातील प्रसिद्ध गायिका एस जानकी यांनीही पद्मभूषण पुरस्‍कार स्‍वीकारण्‍यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे ऑलिम्पिकमध्‍ये भारताला दोनवेळा पदक मिळवून देणा-या कुस्‍तीपटू सुशीलकुमारने पद्म पुरस्‍कार न मिळाल्‍यामुळे आपली नाराजी व्‍यक्‍त केली आहे. उल्‍लेखनीय म्‍हणजे गेल्‍यावर्षी प्रसिद्ध छायाचित्रकार सुनील जाना यांना पद्मश्री पुरस्‍कार जाहीर झाला होता. विशेष म्‍हणजे हा पुरस्‍कार त्‍यांना 40 वर्षांपूर्वीच मिळाला होता.