आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Paint Home With Help Of Electrical Brush ; Time , Hardwork And Colour Saving

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इलेक्ट्रिक ब्रशने रंगवा घर ; वेळ, परिश्रम आणि रंगाची बचत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनंतनाग (काश्मीर) - रंग देण्याचा विषय निघताच अस्ताव्यस्त घर आणि अनेक दिवस नाकी नऊ आणणारे रंगाचे शिंतोडे डोळ्यासमोर येतात. हा त्रास टाळण्यासाठी अनेक लोक रंग देण्याचे काम पुढे ढकलत राहतात. जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाने यावर उपाय शोधून काढला आहे. रंग देण्यासाठी इलेक्ट्रिक ब्रश या तरुणाने तयार केला आहे.

अनंतनाग येथे राहणा-या जहांगीर अहमदचे लक्ष रंग देणा-या कारागिरांकडे गेले. भिंतीवर रंगाचे दोन-चार फटकारे मारले की रंग घेण्यासाठी वाकावे लागते. अंगावर रंगाचे शिंतोडे उडतात. बराच रंग जमिनीवर पडून वाया जातो आणि रंग देण्याच्या या प्रक्रियेत खूप वेळ वायाही जातो. हे सर्व टाळण्यासाठी काहीतरी उपाय शोधण्याचा जहांगीरने ध्यास घेतला.

2006 मध्ये जहांगीरने संशोधन सुरू केले. घरची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसल्याने ब्रशच्या मॉडेलसाठी पैशांची तजवीज करताना बरेच उंबरठे झिजवावे लागले. चार वर्षांच्या मेहनतीने आणि 35 हजार रुपये खर्च झाल्यावर इलेक्ट्रिक ब्रश तयार झाला. या ब्रशने त्याला गेल्या वर्षी राष्‍ट्रपती पुरस्कार मिळवून दिला. सध्या अहमदाबादच्या एका कंपनीसोबत जहांगीर व्यावसायिक स्तरावर या ब्रशचे उत्पादन सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. पुढील दोन महिन्यांत हा ब्रश बाजारात दाखल होईल.

असे काम करतो ब्रश
हा ब्रश एका मोटरपंपने रंगाच्या बादलीला जोडला आहे. मोटारीच्या साहाय्याने रबरी नळीतून रंग थेट ब्रशपर्यंत पोहोचतो. ब्रशच्या टोकापर्यंत रंगाचे प्रमाण समान असते. रंगाचा प्रवाह एका बटणाने नियंत्रित करता येतो. घरासोबतच उंच भिंती रंगवणे, रस्त्यावर तसेच फुटपाथवर रंग देण्यासाठी हा ब्रश उपयोगी ठरेल असा जहांगीरचा दावा आहे. ग्राहकांची गरज लक्षात घेऊन पाच आकारात हा इलेक्ट्रिक ब्रश तयार होत असून, या पूर्ण यंत्राची किंमत साधारण 22 हजार रुपये असेल.