आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकमध्ये तणाव: भीतीमुळे पाकिस्तानी गायकाकडून शो रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या तणावपूर्ण स्थिती आहे. याचा खेळाच्या मैदानात अजून फरक पडला नाही पण संगीत आणि मनोरंजन क्षेत्राला मात्र याचा फटका बसला आहे. ज्या पाकिस्तानी लोकांचे भारतात शो होणार होते ते आता रद्द करण्यात आले आहेत.
पाकिस्तानी गायक अली जाफर शनिवारी टाईम्स म्यूजिक फेस्टिवलमध्ये परफॉर्म करणार होता. मात्र, शिवसेनेच्या विरोधामुळे शेवटच्या क्षणी शो रद्द करावा लागला. पाकिस्तानचा क्लासिकल सिंगर जावेद बशीरने मेकाल हसन बॅंडसोबत रविवारी दिल्लीत ब्लू फ्रोगमध्ये कार्यक्रम केला होता. त्याचा सोमवारी पुन्हा सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम होता. मात्र, शेवटच्या क्षणी हा शो रद्द करण्यात आला.