आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचा आगाऊपणा; समझौता एक्स्प्रेसमधून कुत्री पाठवल्याचा आरोप

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- भारत व पाकिस्ताच्या संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहताच पाकिस्तानी मीडियाने त्यात पुन्हा एकदा मीठ टाकण्याचा प्रयत्न केला आहे. समझौता एक्स्प्रेसमधून कुत्रे पाठवल्याचा आरोप पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. पाकमधील एका प्रमुख दैनिकाच्या वेबसाइटवर एक मार्चच्या अंकात हे वृत्त प्रकाशित झाले आहेत.

यात म्हटले आहे की, 15 फेब्रुवारी रोजी समझौता एक्स्प्रेसमधून त्या दिवशी बेवारस कुत्री लाहोर येथे पाठवण्यात आली आहेत. पाकिस्तानी अधिकार्‍यांनी याची दखल घेत त्याच्या दुसर्‍या आठवड्यात समझौता एक्स्प्रेसमधून 50 बेवारस कुत्री भारतात पाठवली आहे. ही रेल्वे आठवड्यातून दोन दिवस चालवली जाते.