आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistan Giving The Gwadar Port To China Not Well : Defence Minister A K Antany

पाकिस्तानने \'ग्वादर\' बंदर चीनला देणे हे चिंताजनक- संरक्षणमंत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एअरफोर्स बेस (बंगळुरू) - आशियातील सर्वात मोठा एअर शो, एअरो इंडिया प्रदर्शनाला बुधवारी येलहंका हवाई तळावर शानदार सुरुवात झाली. संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅँटनी यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. आम्ही जास्तीत जास्त शस्त्रे भारतीय कंपन्यांकडून खरेदी करू इच्छितो. मात्र, भारतीय कंपन्या संशोधनावर खर्च करत नाहीत, असे अ‍ॅँटनी म्हणाले. पाकिस्तानने चीनला ग्वादर बंदर देण्याची कृती भारतासाठी चिंताजनक आहे, असे ते म्हणाले. अ‍ॅँटनी यांच्या हस्ते पाच दिवसांच्या एअरो शोचे उद्घाटन झाले. पाकिस्तानने चीनला आपल्या बंदरावर बांधकाम करण्याची परवानगी दिली आहे. भारतासाठी हा गंभीर मुद्दा आहे, असे मी त्यांना एका वाक्यात सांगू इच्छितो. ग्वादर बंदर प्रकरणात अ‍ॅँटनी यांची ही पहिली प्रतिक्रिया आहे. एअरो इंडिया शोमध्ये चीनने पहिल्यांदाच सहभागी होणे संबंध सुधारत असल्याचे लक्षण आहे, असे अ‍ॅँटनी यांनी स्पष्ट केले.

600 कंपन्यांचा सहभाग
या प्रदर्शनामध्ये 27 देशांच्या 600 विमान कंपन्यांनी भाग घेतला आहे. संरक्षण मंत्रालय व संरक्षण संशोधन व विकास संस्था, डीआरडीओ दर दोन वर्षाला या शोचे आयोजन करते. हा नववा एअरो शो असून पुढील प्रदर्शन 15 ते 22 फेब्रुवारी 2015 दरम्यान होणार आहे.

अत्याचारी जवानांनाही सजा
अत्याचार प्रकरणातील दोषी जवानांनाही इतर गुन्हेगाराप्रमाणे शिक्षा दिली जाईल, असे अ‍ॅँटनी म्हणाले. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर अ‍ॅक्ट असणा-या भागात अत्याचारासंबंधीच्या कायद्यात सूट देण्याबाबतच्या प्रश्नावर अ‍ॅँटनी यांनी हे उत्तर दिले.