आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'फ्लॅग मिटिंगनंतरही पाककडून फायरिंग; पाकला युद्ध परवडणार नाही\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तान लष्कराने आतापर्यंत केलेल्या कोणत्याही कारवाईचे खुले समर्थन कधीही केले नाही. ते कायम त्रोटक, 'नाही'ची व नकारात्मकच भूमिका घेतात, असे मत भारतीय लष्कराचे उत्तर विभागाचे कमांडर लेफ्टनंट जनरल के. टी. परनाईक यांनी व्यक्त केले.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सोमवारी फ्लॅग मिटिंग झाली होती. मात्र ती निष्फळ ठरली. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी करार झाला आहे. मात्र त्याचे उल्लंगन पाकिस्तानकडून वारंवार होत आहे. सोमवारी फ्लॅग मिटिंग झाल्यानंतरही पाकिस्तानकडून तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाल्याचे परनाईक यांनी म्हटले आहे. पाककडून छोट्या प्रकारची कारवाई झाली आहे. पाकने फ्लॅग मिटिंगनंतरही कारवाया चालू ठेवल्या असल्या तरी आम्ही आताच तातडीने कारवाई करणार नाही. आम्ही आमची लढाई ठरल्याप्रमाणे नियोजनाने लढू, असे परनाईक यांनी स्पष्ट केले.
सध्य स्थितीत भारत- पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल अशी शक्यता नाही. पण ते झालेच तर पाकिस्तानला ते परवडण्यासारखे नाही, अशी पुष्टीही परनाईक यांनी जोडली.