आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकव्याप्त काश्मिरातून 100 काश्मिरी तरुणांना मायदेशी आणणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू - पाकव्याप्त काश्मिरातून मायदेशी परतण्याची इच्छा असलेल्या काश्मिरी तरुणांना मायदेशी आणण्यासाठी दुस-या देशाची मदत घेतली जाणार आहे. पाकिस्तानच्या आडमुठेपणामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 100 काश्मिरी तरुणांना थेट भारतात न आणता अन्य देशात नेले जाईल. त्यानंतर मायभूमीवर पाय ठेवता येईल. हे तरुण शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरात गेले होते.
पाकिस्तानच्या नादाला लागून भटकलेल्या काश्मिरी तरुणांना मायदेशी परत आणण्याची योजना मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गतवर्षी सुरू केली होती. त्यासाठी सुमारे 300 पालकांनी अर्ज केले होते. विविध संस्थांच्या चौकशी व तपासाअखेर सुमारे 100 तरुणांना मायदेशी आणण्यास गृह मंत्रालयाने मंजुरी दिली होती; परंतु त्यांना आणायचे कसे व कुठून यामुळे हे सर्व प्रकरण अडकून पडले आहे.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या साथीने राज्य सरकारने चार पर्यायी मार्ग निवडले होते. त्यामध्ये उडी -मुज्जफ राबाद, पूंछ-रावलाकोट रस्ता अथवा विमानाने दिल्ली अथवा वाघा बॉर्डर या
मार्गांचा त्यात समावेश होता; परंतु याप्रकरणी पाकिस्तानने मदत करण्यास स्पष्ट नकार दिला.
पोलिस महासंचालक कुलदीप खुड्डा यांनी सांगितले की, या तरुणांच्या मायदेशी परतण्यासाठी मसुदा तयार करण्यात आला आहे. यासाठी दुस-या देशाची मदत घेतली जाणार आहे; परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी या देशाचे नाव सांगण्यास नकार दिला.
गृह सचिव जी. के. पिल्लई यांच्यासोबत 10 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा झाली होती. पाकव्याप्त काश्मिरातून या तरुणांना प्रथम मदतीचा हात पुढे करणा-या देशात नेले जाईल. त्यानंतर दिल्लीस आणण्यात येईल. ज्याच्याविरुद्ध गुन्हेगारी स्वरूपाची तक्रार नसल्यास त्याला नातेवाइकाकडे सूपर्द केले जाईल.ज्या तरुणांविरुद्ध तक्रारी, गुन्ह्यांची नोंद असेल त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असे खुड्डा यांनी स्पष्ट केले.