आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान संघाचे सामने मोदींच्या गुजरातमध्ये होण्यावर बंदी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- एलओसीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने दोन्ही देशांतील संबंधांवर त्याचा परिणाम दिसून येऊन लागला आहे. दोन भारतीय जवानांची हत्या झाल्यानंतर हॉकी लीगसाठी भाग सामन्यांसाठी सहभागी झालेल्या नऊ पाकिस्तानी हॉकी खेळाडूंना माघारी पाठविण्याचा निर्णय झाला. तसेच अनेक पाक गायकांना आपले कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत. आता गुजरात क्रिकेट असोसिएशनने महिला क्रिकेट विश्वकप 2013 च्या यजमानपद भूषविण्यास नकार दिला आहे.
गुजरात क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयला याबाबत सूचना दिली आहे. गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजेश पटेल यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानी खेळाडू खेळणार असल्याने या सामन्यांसाठी विरोध होऊ शकतो. बीसीसीआयने आम्हाला संपर्क केला होता व विचारले होते की, काय गुजरात महिला क्रिकेट विश्वकप-2013 चे यजमानपद भूषवू इच्छिता?
सीमेवर दोन्ही देशांदरम्यान तणावपूर्ण वातावरण असल्याने यजमानपद भूषविण्यास नकार दिला आहे. आता येथील सामना आता मुंबईत खेळवायचा किंवा इतर ठिकाणी याबाबत निर्णय बीसीसीआय घेईल. बीसीसीआयने मुंबईत होणारे पाकिस्तान संघाचे पाच सामने अहमदाबादला शिफ्ट करण्याबाबत गुजरात क्रिकेट असोसिएशनकडे संपर्क साधला होता.