आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistani Army Claims Indian Army Killed Their Jawan

भारताच्‍या गोळीबारात आमचा सैनिक ठारः पाकच्‍या उलट्या बोंबा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- भारत आणि पाकिस्‍तानमध्‍ये तणाव वाढत असतांनाच प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरुच आहे. तर आज लष्‍करप्रमुख बिक्रम सिंग यांनी शहिद हेमराजच्‍या गावी जाऊन त्‍याच्‍या कुटुंबियांचे सांत्‍वन केले. लष्‍करप्रमुखांनी हेमराजला श्रद्धांजली अर्पण केली.

पाकिस्‍तान स्‍वतःची चूक मान्‍य करण्‍याऐवजी भारतावरच शस्‍त्रसंधी भंग केल्‍याच्‍या उलट्या बोंबा करीत आहे. पाकिस्‍तानच्‍या परराष्‍ट्रमंत्री हिना रब्‍बानी खार यांनी त्‍यातही एक पाऊल पुढे उचलून भारतीय येत्‍यांना देशातील घडमोडींवरुन धडा घेण्‍याचा सल्‍ला दिला आहे. लष्‍करप्रमुख बिक्रम सिंग यांचे वक्तव्‍य अतिशय आक्रमक असल्‍याचेही खार म्‍हणाल्‍या.

काल रात्री नियंत्रण रेषेवर पुन्‍हा गोळीबार झाल्‍याचे वृत्त आहे. सुमारे तासभर गोळीबार सुरु होता. यावेळी गोळीबारात आमचा सैनिक मारला गेला, असा आरोप पाकिस्‍तानी सेनेने भारतावर केला आहे. नायक अशरफ असे मृत जवानाचे नाव असल्‍याचे पाकिस्‍तानी सेनेने सांगितले. भारतीय सैन्‍याने मात्र यावर अद्याप उत्तर दिला नाही.