आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तानच्‍या वाणिज्‍य मंत्र्यांचा भारत दौरा रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- प्रत्‍यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय सैनिकांची हत्‍या झाल्‍यानंतर भारत आणि पाकिस्‍तानमध्‍ये तणाव वाढला आहे. याचे हळूहळू राजकीय परिणाम दिसू लागले आहेत. पाकिस्‍तानचे वाणिज्‍यमंत्री मखदूम अमीन फहीम यांनी भारत दौरा रद्द केला आहे. फहीम हे या महिन्‍याच्‍या अखेरीस एका व्‍यावसायिक बैठकीसाठी आग्रा येथे येणार होते.

फहीम यांचा दौरा रद्द झाल्‍यानंतर पत्रकारांनी त्‍यांना याबाबत विचारणा केली. त्‍यावेळी फहीम म्‍हणाले, यात दोन्‍ही देशांमध्‍ये वाढलेल्‍या तणावाचे कारण नाही. भारतातील बैठक आणि ताहिर उल कादरी यांच्‍यासोबतच्‍या बैठकीची तारीख एकच होती. कादरी यांच्‍यासोबत झालेल्‍या करारावर माझेही हस्‍ताक्षर आहे. त्‍यामुळे मला त्‍या बैठकीला उपस्थित राहणे आवश्‍यक आहे.

फहीम यांनी वेगळाचा दावा केला असला तरीही वाढलेल्‍या तणावामुळेच त्‍यांनी भारत दौरा रद्द केल्‍याचे सुत्रांनी सांगितले. भारताने फहीम यांना आग्रा येथे होणा-या बैठकीत येऊ नये, असे सांगितले. अर्थात यास दुजोरा मिळाला नाही. परंतु, पाकिस्‍तानच्‍या वाणिज्‍य मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठकीचा कोणताही कार्यक्रम नाही, असे केंद्रीय वाणिज्‍य मंत्री आनंद शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.