आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुसखोरी करणारा पाकिस्‍तानी सैनिक ठार, भारताकडून मृतदेह परत करण्‍याचे सौजन्‍य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पाकिस्‍तानने पुन्‍हा एकदा शस्‍त्रसंधीचा भंग केला असून घुसखोरी करणा-या पाकिस्‍तानी सैनिकाचा भारतीय जवानांनी ठार मारले आहे. सर्वप्रथम हा एखादा घूसखोर असण्‍याचा अंदाज व्‍यक्त करण्‍यात आला होता. परंतु, सैन्‍याने सविस्‍तर माहिती देताना हा पाकिस्‍तानी सैनिक असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. त्‍याचा मृतदेह पाकिस्‍तानला सोपविण्‍यात येणार आहे. जानेवारीमध्‍ये पाकिस्‍तानी सैन्‍याने सीमारेषेवर भारतीय सैनिकांची हत्‍या करुन शिरच्‍छेद केला होता. त्‍यापैकी एकाचे शिर ते प‍ाकिस्‍तानात घेऊन गेले होते. परंतु, भारताने त्‍यांच्‍या सैनिकाचा मृतदेह परत करण्‍याचे सौजन्‍य दाखविले आहे. प‍ाकिस्‍तानने मात्र भारतीय सैनिकाचे शिर परत करण्‍याऐवजी त्‍याला मारणा-याला बक्षीस दिले.

सैन्‍याने दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी राजौरी जिल्‍ह्यात नौशेरा सेक्‍टरमध्‍ये पाकिस्‍तानी सैन्‍याने गोळीबार केला. त्‍यावेळी प्रत्‍युत्तरात केलेल्‍या गोळीबारात भारताच्‍या जवानांनी एका घूसखोराला ठार केले. ठार झालेला घूसखोर पाकिस्‍तानी सैनिक होता, असे पाकिस्‍तानच्‍या सैन्‍याने मान्‍य केले असून त्‍याचा मृतदेह सोपविण्‍याची मागणी केली आहे. दोन्‍ही देशांमध्‍ये डीजीएमओ स्‍तरावर चर्चा झाली. शुक्रवारी सैनिकाचा मृतदेह पाकिस्‍तानला सोपविण्‍यात येईल, असे सैन्‍याचे जनसंपर्क अधिकारी जगदीप दाहिया यांनी सांगितले. या सैनिकाने भारतीय जवानांवर गोळीबार केला होता. त्‍यामुळे आम्‍ही प्रत्‍युत्तर दिले. त्‍याच्‍या गोळीबारात भारतीय सैनिक मेजर सिंग जखमी झाले आहेत.