आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parliament Attack To Afzal Guru Hang Time Feriod

संसदेवरील हल्ला ते फाशीपर्यंतचा प्रवास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

13 डिसेंबर 2001 : पाच अतिरेक्यांनी हल्ला केला. 9 जण ठार, 15 जखमी. हल्ला करणारे पाचही दहशतवादी ठार.
15 डिसेंबर 2001 : दहशतवादी संघटना जैश-ए-महंमदचा सदस्य अफजल गुरू याला दिल्ली पोलिसांनी जम्मू-काश्मिरात ताब्यात घेतले. दिल्ली विद्यापीठाच्या झाकीर हुसेन कॉलेजचा एसएआर गिलानी याची चौकशी करण्यात आली. नंतर त्यालाही अटक करण्यात आली. त्यानंतर अफसाना गुरू आणि तिचा पती शौकत हुसेन गुरू यांनाही अटक करण्यात आली.
04 जून 2002 : अफझल गुरू, गिलानी, शौकत हुसेन गुरू आणि अफसाना गुरू यांच्यावर आरोपनिश्चिती.
18 डिसेंबर 2002 : एसएआर गिलानी, शौकत हुसेन गुरू आणि अफझल गुरू यांना फाशीची शिक्षा.अफसाना गुरू सुटली.
30 ऑगस्ट 2003 : हल्ल्याचा मुख्य आरोपी जैश-ए-महंमदचा म्होरक्या गाझीबाबा श्रीनगर येथे बीएसएफसोबत चकमकीत मारला गेला.
29 ऑक्टोबर 2003 : एसएआर गिलानीही सुटला
04 ऑगस्ट 2005 : अफझल गुरूच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब. शौकत हुसेनच्या फाशीचे दहा वर्षांच्या कैदेत रूपांतर
03 ऑक्टोबर 2006 : अफझल गुरूची पत्नी तबस्सुम गुरू हिने राष्ट्रपती कलाम यांच्याकडे दयेसाठी अर्ज केला.
12 जानेवारी 2007 : सुप्रीम कोर्टाने अफझलची दया याचिका फेटाळली. याचिका विचार करण्यायोग्य नाही असे स्पष्ट केले.
19 मे 2010 : दिल्ली सरकारनेहीअफझल गुरूचा दयेचा अर्ज फेटाळला.