आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपाध्यक्ष होताच राजनाथ यांची ग्वाही पक्ष गडकरी यांच्या पाठीशी राहणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - मावळते अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावरील आरोपांचा सामना करण्यासाठी अवघा पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी ग्वाही भाजपचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांनी बुधवारी दिली. मंगळवारच्या नाट्यमय घडामोडींनंतर बुधवारी कोणीही उमेदवारी दाखल न केल्याने राजनाथ यांची पक्षाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 61 वर्षीय राजनाथ यांच्याकडे तिस-या दा ही जबाबदारी आली असून अंतर्गत मतभेद व गडकरींवरील आरोपांनंतर पक्षाची प्रतिमा सुधारण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे. राजनाथसिंह यांच्याच नेतृत्वाखाली 2014च्या निवडणुका लढवल्या जातील. या वेळी गडकरी यांनी भाजप लोकशाहीवादी पक्ष असल्याचे या निवडणुकीने सिद्ध केल्याचे सांगितले.