आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Password Leak, Yahoo Breach Extends Beyond Yahoo To Gmail Users

4.5 लाख पासवर्ड लीक: तुमचं Gmail धोक्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिकन इंटरनेट कंपनी 'याहू डॉट कॉम'च्या लाखो यूजर्सचे पासवर्ड लीक झाले आहेत. याशिवाय 'जीमेल', 'एओएल', 'हॉटमेल', 'कॉमकास्ट', 'एमएसएन' 'एसबीसी', 'ग्लोबल वॅरीझोन', 'बेलसाउथ' आणि 'लाईव्ह डॉट कॉम'वरील यूजर्सवरही संकटाचे सावट आहे.
'याहू! वॉइस'चा भाग भेदण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. याहू! वॉइस नॉन- याहू ईमेल अ‍ॅड्रेसच्या साह्यानेही साइन इनला परवानगी देतो. त्यामुळेच याहूचे पासवर्ड लीक झाल्याचे समजते.
'याहू'चे चार लाख 53 हजार 492 यूजर्सचे पासवर्ड लीक झाले असून, ते ऑनलाइन पोस्टही करण्यात आले आहेत. स्वत:ला the D33Ds Company म्हणणार्‍या एका ग्रुपने याची जबाबदारी स्विकारली आहे. SQL इंजेक्शन अटॅकच्या माध्यमातून पासवर्ड लीक करण्यात आले असल्याचे एका सिक्युरिटी फर्मने सांग‍ितले.
पासवर्ड लीक होण्याची घटना काही नवी नसून यापूर्वी सोशल नेटवर्किंग साइट 'लिंक्ड इन'च्या 64 लाख अकाउंट्सच्या सिक्युरिटीमध्ये छेडछाड करण्यात आली होती. याप्रकरणी 'लिंक्ड इन'चे डायरेक्टरनी यूजर्सची माफी देखील मागितली होती.
तुमचा पासवर्ड लीक झाला आहे?
'सुकुरी मालवेयर लॅब्‍स'ने एक लिंक दिली आहे. त्या माध्यमातून तुमचा पासवर्ड लीक झाला आहे किंवा नाही, हे तुम्ही तपासून घेऊ शकता. लिंक पुढीलप्रमाणे http://labs.sucuri.net/?yahooleak
PHOTOS:'डीएनएस चेंजर' व्हायरसची हवा गुल; इंटरनेटवर परिणाम नाही
इंटरनेट ब्राउजिंग करताना या गोष्टी लक्षात ठेवा
इंटरनेट : फेसबुक, जी-मेल एकत्र येणार!