आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • People Who Sacrificed High Salary Jobs In Foreign For Their Parents

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आई-वडिलांच्या सेवेसाठी भक्कम पगाराच्या नोकरीला ठोकला रामराम !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळः आयुष्यात काही तरी वेगळे करून दाखवायचे, या जिद्दीने करिअरला प्राधान्य दिले. मोठय़ा हुद्दय़ाची नोकरी, नाव, पैसा सारेच मिळाले. पण समाधान नव्हते. देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये काम करणार्‍या या लोकांना आई-वडिलांची काळजी सतावत होती. अखेर आई-वडिलांसाठी नोकरीला रामराम ठोकला अन् घरी परतले. तुलनेने कमी पगाराची नोकरी स्वीकारली किंवा व्यवसाय सुरू केला. आधीपेक्षा पैसा कमी मिळत असला तरी आपल्या माणसांत, आई-वडिलांसोबत राहण्याचे समाधान नक्कीच मोठे आहे. करिअरसाठी घराकडे परतूनही न पाहणार्‍या, आई-वडिलांना घरातून हाकलून देणार्‍या किंवा वृद्धार्शमात पाठवणार्‍या मुलांनी या उदाहरणांतून नक्की धडा घ्यावा.

इंजियनिअरने उघडला दवाखाना
जिनेंद्र भारल. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून पत्नीसोबत अमेरिकेत स्थायिक झाले होते. पत्नी तेथे परिवहन विभागात काम करत होती. जिनेंद्र एका सॉफ्टवेअर कंपनीत होते. 1995 साली आईच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने अमेरिका सोडली. पत्नी अमेरिकेतच राहते. थकलेल्या आईची सेवा सुरू केली. भोपाळमध्ये होमिओपॅथीची डिग्री घेऊन घरातच दवाखाना सुरू केला.

आईच्या उपचारांसाठी गावी परतले
रॉबिन जैन. 25 वर्षे वय. मुंबईत एका ऑस्ट्रेलियन कंपनीत काम करत होते. ऑक्टोबर 2011 मध्ये आईला कॅन्सर झाल्याचे कळले. तत्काळ भारतात परतले व आईच्या सेवेत रुजू झाले. वैद्यकीय उपचार आणि देखभालीमुळे आईची प्रकृती सुधारली. काही दिवसांनी रॉबिनला एका बँकेत उपव्यवस्थापकाची नोकरी मिळाली. कमी पगार असला तरी आई-वडिलांची सेवा करण्यात खूप समाधान मिळाल्याची भावना आहे.

आयुष्यात पैसाच सर्वस्व नाही!
राजकुमार सक्सेना. देवी अहिल्या विद्यापीठातून पर्यटन विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून एका कूकर कंपनीत ब्रँच मॅनेजर म्हणून रुजू झाले. बंगलोरला बदली झाली. आई आणि निवृत्त वडिलांना एकटे सोडून बंगलोरमध्ये नोकरी व इतर कामात लक्ष लागत नव्हते. नोकरी सोडून घरी परतले. आता ते भोपाळमधील मंडीदीपमध्ये इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहेत. आई-वडिलांसोबत समाधानी आहेत.

अमेरिकेतील नोकरीवर पाणी
अनुराग श्रीवास्तव - 1991 मध्ये मॅनिटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन अमेरिकेत गेलेले अनुराग तेथेच पदव्युत्तर शिक्षण घेऊन एका सॉफ्टवेअर कंपनीत चांगल्या पॅकेजवर नोकरीला लागले. काही दिवस चांगले गेले, पण नंतर भोपाळ येथे राहणार्‍या आई-वडिलांची सेवा करणारे घरात कोणी नसल्याची चिंता सतावू लागली. मग काय, नोकरी सोडली अन् भोपाळला परतले. 1998 मध्ये नेट लिंक नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली.