Home »National »Delhi» Performance-Of-Satyamev-Jayate

सत्यमेव जयते : आमिरची मागणी गेहलोत यांनी केली मान्य

दिव्य मराठी वेब टीम | May 09, 2012, 15:13 PM IST

  • सत्यमेव जयते : आमिरची मागणी गेहलोत यांनी केली मान्य

नवी दिल्ली- सत्यमेव जयते या टीव्ही शोद्वारे स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भातील देशातील भीषण परिस्थिती दाखविण्यात यशस्वी ठरलेल्या आमिर खानला मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी 'बेटी बचाओ' या राज्य सरकारच्या अभियानात सहभागी होण्यास निमंत्रण दिले. स्त्री भ्रूण हत्येसंदर्भातील खटल्यांचा निकाल लवकर लावण्यासाठी राज्यात फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करावे, ही आमिरची मागणी गेहलोत यांनी मान्य केली. याबाबत लवकरच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी बोलू, असे आश्वासन गेहलोत यांनी दिले.
सर्वाधिक स्त्री भ्रूण हत्या होत असलेल्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमिर खानची भेट घेतली व जनजागृती केल्याबाबत आभार मानत यावर सरकार काही ठोस उपाययोजना करेल, असे सांगितले. हा सगळा परिणाम साधला आहे आमिर खानच्या सत्यमेव जयतेवरील स्त्री भ्रूण हत्येबाबत देशातील स्थितीने.
टीव्ही शो सत्यमेव जयतेकडून स्टार इंडिया आणि आमिर खान यांना मोठ्या आशा आहेत. आतापर्यंत मिळालेल्या प्रतिसादानुसार, त्यांच्या अपेक्षांना यश मिळाल्याचे दिसून येत आहे. मात्र खरे आव्हान हे आहे की, यापुढेही हा शो लोकांच्या पंसतीस उतरेल का?
आमिर खान :आमिर खानचा टीव्हीवरील हा पहिलाच शो आहे. त्यामुळेच एक होस्ट (सूत्रसंचालक) म्हणूनही त्याची परीक्षा असेल. मात्र तो यात नक्कीच यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे. याचा फायदा त्याला होत असून त्याची ब्रॅंड व्हॅल्यू खूपच वाढली आहे.
या शोच्या प्रत्येक भागासाठी तो तीन कोटी रुपये घेत आहे. आतापर्यंत शो होस्ट करण्यासाठी कोणत्याही कलाकाराला एवढी मोठी रक्कम मिळाली नाही. आमिताभ बच्चन (कौन बनेगा करोडपती), शाहरुख खान ( कौन बनेगा करोडपती, क्या आप पांचवी पास से तेज है), सलमान खान (बिग बॉस, दस का दम), अक्षरकुमार (खतरों के खिलाडी, मास्टर शेफ इंडिया) आणि ऋतिक रोशन (जस्ट डान्स) यासारख्या बड्या स्टार मंडळींनाही एका भागासाठी एक-दोन कोटीच्या दरम्यानच रक्कम मिळाली आहे. त्याला देण्यात आलेली तीन कोटी रक्कम हे स्पष्ट करते की सध्या त्याची मार्केट व ब्रॅंड व्हॅल्यू सर्वात जास्त आहे. तसेच शो ला मिळालेल्या प्रतिसादावरुन व सामाजिक बाबींचा केलेला ऊहापोह यावरुन त्याची प्रतिमा अधिकच वेगळी बनली आहे.
स्टारलाही कमाई-स्टारने बनवलेल्या या शोच्या एका एपिसोडसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च येत आहे. जो इतर कोणत्याही कार्यक्रमापेक्षा खूपच जास्त आहे. साधारणपणे प्राईम टाईमला प्रसारित होणा-या ३० मिनिटाच्या एका टीव्ही शोसाठी साधारणपणे ८-१० लाख रुपये खर्च येतो. तसेच या शोसाठी ३५ लाख ते दोन कोटीपर्यंत होस्टचा खर्च होतो. जो होस्ट जितकी रक्कम घेईल तितका त्या एपिसोडचा खर्च वाढतो.
स्टार इंडियाचे सीओओ संजय गुप्ता यांच्या माहितीनुसार सत्यमेव जयतेच्या कार्यक्रमासाठी दहा सेकंदाच्या जाहीरातीसाठी दहा लाख रुपये आकारले जात आहेत. हा आरडा तर सामन्या कार्यक्रम व शोपेक्षा खूपच मोठा आहे. भारतासह जगभरात लोकप्रिय ठरलेल्या व क्रिकेटचे कमालीचे वेड असलेल्या आपल्या देशात आयपीएलच्या प्राईम टाईमच्या दहा सेकंदाच्या जाहीरातीसाठी चार लाख रुपये घेतले जात आहेत. मात्र आमिरच्या या शोसाठी जाहीरातून पैशाचा पाऊस पडत आहे.
भारतातील सगळ्यात मोठी मोबाईल टेलीकॉम कंपनी भारती एयरटेल लिमिटेड या शोची मुख्य प्रायोजक आहे. एयरटेलने या शोसाठी १८ कोटी रुपये दिले आहेत. तर वॉटर प्यूरीफायर कंपनी अक्वागार्डने यासाठी १६ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय या शोसाठी एक्सिस बॅंक लिमिटेड, कोका कोला इंडिया, स्कोडा ऑटो इंडिया, बर्जर पेंट्स इंडिया लिमिटेड, डिक्सी टेक्स्टाइल प्रायवेट लिमिटेड आणि जॉन्सन एंड जॉन्सन लिमिटेड कंपन्या सहप्रायोजक आहेत. या कंपन्यांनी प्रत्येकी ६-७ कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे या शोसाठी सुमारे ४० कोटी रक्कम लावली आहे. त्यामुळे हा शो आताच फायद्यात असल्याचे दिसून येत आहे.
स्टार इंडियाने याचे प्रक्षेपण आपल्या विविध ९ चॅनलवर केले आहे. त्यासाठी स्टारने आपल्या मार्केटिंग आणि विक्री धोरणात कमालीचा बदल केला आहे. त्यामुळे जाहीरात प्रसारणाचे स्लॉट शोच्या आधीच विकले गेले आहेत. याशिवाय या शोवर आमिर खान व स्टार इंडियाचे इंटेलेक्टुअल प्रॉपर्टी राईट्स असतील. त्यातून कमाई मिळणार आहे. याशिवाय स्टारसह आमिरची मार्केट व ब्रॅंड व्हॅल्यू वाढणार आहे.
या शोचे १३ भाग प्रसारित होणार आहेत. हा शो दुरदर्शनवरही प्रसारित केला जात आहे. यातूनही कोट्यावधी रुपये स्टार व आमिरला मिळणार आहेत. या क्रार्यक्रमाने टीआरपीचा रेकॉर्डब्रेक केला आहे. त्यामुळे याला आणखी वेगळ्या रुपाने फायदा मिळाल्यास आश्चर्य वाटू नये.
'सत्यमेव जयते' : एक लाख लोकांनी केला आमिरला फोन
'लोकांना मुर्ख बनवतोय आमिर, फ्लॉप आहे सत्यमेव जयते'... इति केआरके
प्रेक्षकांच्या मनाला भावला सत्यमेव जयते, आमिर झाला भावूकNext Article

Recommended