आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका आठवडाभरात!

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणुकांच्या रणधुमाळीत तीन महिने शांत असलेले पेट्रोल-डिझेल दरवाढीचे भूत पुढच्या आठवड्यात ग्राहकांच्या मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे. पाच राज्यांतील निवडणुका संपल्यानंतर तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलच्या दरांत 2 ते 4 रुपयांची दरवाढ होण्याचा दाट अंदाज आहे. या राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा चालू आठवड्यात पार पडणार आहे.
सरकारी अखत्यारीतील तेल कंपन्यांना लिटरभर पेट्रोलमागे 4 रुपयांचा तोटा होत असल्याचे एका अधिकाºयाने सांगितले. गेल्या 1 डिसेंबरला शेवटच्या वेळी दरांत सुधारणा केली होती. तेव्हापासून तेल कंपन्यांना सुमारे 900 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. डिसेंबरमधील दरवाढीच्या वेळी जागतिक बाजारात गॅसोलिनचे दर 109 डॉलर्स प्रतिबॅरल होते. सध्या हे दर 125 डॉलर्स प्रतिबॅरलवर पोहोचले आहेत. यामुळे काहीही झाले तरी दरवाढ अटळ असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. दरम्यान, 12 मार्चपासून सुरू होणाºया बजेट अधिवेशनापूर्वी डिझेलचीही दरवाढ निश्चित असल्याचे दुसºया अधिकाºयाने म्हटले आहे. इंडियन आॅइल कॉर्पाेरेशन, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्या दररोज 410 कोटी रुपये गमावत आहेत.
सरकारी कंपन्यांचा तोटा
पेट्रोल 04 रु.
डिझेल 12.77 रु.
केरोसीन 30.21 रु.
एलपीजी 378 रु.