आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल महागले; औरंगाबादेत 74.63

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पेट्रोलच्या दरात मंगळवारी मध्यरात्रीपासून प्रतिलिटर 35 पैशांची वाढ करण्यात आली आहे. वाढीव दरानुसार औरंगाबादेत पेट्रोल प्रतिलिटर 74.63 रुपये झाले आहे.

कच्च्या तेलाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने ही दरवाढ करण्यात आली आहे. देशातील इतर शहरांमध्ये स्थानिक कर किंवा व्हॅटमुळे पेट्रोलच्या भावात तफावत येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. गेल्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात अनुक्रमे 56 आणि 95 पैशांची कपात केली होती.