आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल रुपयाने, तर डिझेल 50 पैशांनी महागणार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येत्या शनिवारपर्यंत पेट्रोल लिटरमागे एक रुपयाने, तर डिझेल 50 पैशांनी महागण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांना देण्यात आलेल्या अंशत: नियंत्रणमुक्तीमुळे ही भाववाढ होणार असल्याचे कंपन्यांच्या सूत्रांनी म्हटले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीमुळे तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीत लिटरमागे 1.32 रुपये, तर डिझेलमध्ये 9.22 रुपये तोटा होत आहे. तेल कंपन्यांच्या 15 फेब्रुवारी रोजी होणाºया आढावा बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात येणार आहे, असे इंडियन ऑ इल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आर.एस. बटोला यांनी सांगितले.