आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Price Hiked By Rs 1.40 Per Litre, Excluding VAT, With Effect From Midnight Tonigh

बजेटच्‍या दुस-याच दिवशी पेट्रोलचा भडका; प्रतिलिटर सुमारे दीड रुपयाची वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/ नवी दिल्ली- अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे निराश झालेल्या सामान्य माणसाला सरकारने आणखी एक दणका दिला. सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर सुमारे दीड रुपयाची वाढ केली. 13 दिवसांपूर्वीच आंतरराष्टÑीय बाजारातील कच्च्या तेलाचे भाव वाढल्याचे सांगत कंपन्यांनी हे दर दीड रुपयाने वाढवले होते.
या वेळी 1.40 रुपयांची वाढ केली असली तरी स्थानिक कर आणि व्हॅटमुळे ती दिल्लीत 1.68 रुपयापर्यंत पोहोचली आहे. विविध शहरांत स्थानिक करांनुसार दर वेगवेगळे राहतील. दरवाढीला विरोध करत ही जनतेशी प्रतारणा असल्याची टीका भाजपने केली. दरवाढ तत्काळ मागे घेण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

...पुन्हा जुनाच बहाणा
इंडियन ऑइलने सांगितले की, 16 फेब्रुवारीला दरवाढ झाली होती. मात्र तेव्हापासून कच्चे तेल 128.57 डॉलर प्रतिबॅरलवरून 131 डॉलरवर पोहोचले आहे. या कालावधीत डॉलरच्या तुलनेत रुपया 72 पैशांनी कमकुवत झाला.