आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोलच्या 'साडेसाती'वर दोन रुपयांचा उतारा, आज मध्यरात्रीपासून दर कमी होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्र सरकारने मागील आठवड्यात पेट्रोलच्‍या किंमतीत प्रतिलिटर साडेसात रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात आता कपात करण्यात आली असून आज मध्यरात्रीपासून पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्त होणार असल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.
२५ मे रोजी तेल कंपन्यांनी पेट्रोल दरात प्रतिलिटरमागे साडेसात रुपयांची वाढ केली होती. आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयांचा भाव घसरल्याने व डॉलर वधारल्याने प्रति लिटर आठ रूपये नुकसान होत असल्‍याचे सरकारी क्षेत्रातील तेल कंपनी इंडियन ऑइल कार्पोरेशनने (आयओसी) म्‍हटले होते. त्यानुसार, पेट्रोलच्‍या दरात वाढ करण्यात आली होती. दरम्यान त्यानंतर सरकारवर विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी ३१ मे रोजी भारत बंदचे आयोजन केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला होता. सरकारमध्ये सामील असलेल्या ममता बॅनर्जी यांनीही सरकारवर टीका करताना दरवाढ कशी काय केली, असा प्रश्न केला होता. सपानेही पेट्रोल दरवाढीला विरोध केला होता.
देशात सर्वत्र महागाई असताना केंद्र सरकारने सामान्यांना पेट्रोल दरात मोठी वाढ करुन एक मोठा धक्का दिला होता. मात्र सरकारने आज सामन्यांना थोडापार दिलासा देताना २ रुपयांनी पेट्रोलचे दर कमी केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलच्या प्रति बॅरलचा भाव १०५ डॉलरवरुन ८६ डॉलरवर घसरला आहे. त्याचा अंदाज घेत सरकारने सामान्यांना दिलासा देण्यासाठी तसेच विरोधकांची धार कमी करण्यासाठी पेट्रोलच्या 'साडेसाती'वर २ रुपयांचा उतारा दिला आहे.
पेट्रोल दरवाढीचा दुहेरी दणका, नागपुरकर हैराण (पाहा फोटो)
कच्‍च्‍या तेलाचे बाजारातील वास्‍तवः सरकार दरवाढ घेईल का मागे?
इथे मिळते ७४ रुपयात ३० लिटर पेट्रोल