आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोलपंप, गॅस एजन्सी ओबीसींनाही आरक्षण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नवीन पेट्रोलपंप आणि एलपीजी डीलरशिप देताना ओबीसींसाठी 27 टक्के आरक्षण ठेवण्याची केंद्र सरकारची योजना आहे. सरकारी नोक-या आणि उच्च शिक्षणात हे आरक्षण पूर्वीच लागू आहे. पेट्रोलपंप आणि एलपीजी डीलरशिपसाठी सध्या अनुसूचित जाती आणि जमातींसाठी 25 टक्के आरक्षण आहे. आता ओबीसींनाही याचा फायदा मिळेल. पेट्रोलियम मंत्रालयाच्या अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
यात घटनात्मक आरक्षण देण्याची व्यवस्था लागू असेल. नवीन मार्गदर्शक तत्त्वांत अनुसूचित जाती-जमातींचा कोटा 22.5 टक्के करून ओबीसींना पंप किंवा एलपीजी एजन्सीसाठी 27 टक्के कोटा देण्याचा उल्लेख असेल. उर्वरित 50 टक्के कोटा सर्वसामान्य वर्गासाठी असेल. या एकूण कोट्यात 33 टक्के महिलांनाही आरक्षण देण्यात येणार आहे.